आजपर्यंत तुम्ही असं झाड कधीच पाहिलं नसेल! कोल्हापुरात दुर्मिळ वृक्षाची चर्चा VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
याठिकाणी अनेक दुर्मिळ वृक्षांची संपदा येथे पाहायला मिळते. अशातच कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरात असणाऱ्या वासुदेव बळवंत फडके उद्यानात तुमा नावाच्या वृक्षाची प्रथमच नोंद झाली आहे.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरला ऐतिहासिक वारस्याबरोबरच निसर्गाचा अनमोल ठेवा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. याठिकाणी अनेक दुर्मिळ वृक्षांची संपदा येथे पाहायला मिळते. अशातच कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरात असणाऱ्या वासुदेव बळवंत फडके उद्यानात तुमा नावाच्या वृक्षाची प्रथमच नोंद झाली आहे. हा वृक्ष म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम या ठिकाणी आढळतो. कोल्हापूर जिल्ह्यात ताराबाई पार्क परिसरात आणि शाहुवाडी मार्गावर असणाऱ्या ओकोली जवळच्या एका डोंगरावर हे वृक्ष आढळलेले आहेत. या वृक्षाचा मलकापूर येथील प्रा. एन. डी. पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉक्टर मकरंद ऐतवडे यांना या दोन ठिकाणी हे वृक्ष निदर्शनास आले. याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
काय आहेत वैशिष्ट्ये?
तुमा या पर्णझडी वृक्षाचे शास्त्रीय नाव मिलेशिया पेगूएन्सिस असे असून हा वृक्ष फॅबेसी म्हणजेच करंज यांच्या कुळातील आहे. बंगाली भाषेत या वृक्षाला तुमा असे म्हटलं गेलंय. हेच नाव भारतात प्रचलित झालं आहे. तुमा या शब्दाचा अर्थ आहे मोत्यांसारखी-रत्नांसारखी फुले असणारा. या वृक्षाला इंग्रजीत ज्युवेल्स ऑन स्टिंग आणि मोलुमेन रोझवूड अशी नावे दिली गेली आहेत. सर्वत्र असणाऱ्या करंज या वृक्षाशी या वृक्षाचे बरेचसे साम्य आहे पण या वृक्षाची फुले गुलाबी-लालसर रंगाची असतात. त्यामुळे या वृक्षाला लाल करंज असेही म्हटले जाते.
advertisement
हा वृक्ष लहान ते मध्यम आकाराचा, काहीसा डेरेदार असून, फांद्या खाली लोंबणाऱ्या असतात. हा वृक्ष 4 ते 6 मीटर, तर काहीवेळा 8 मीटर उंचीपर्यंत वाढतो. खोडाचा व्यास 10 ते 20 सें. मी. इतका असून, साल गुळगुळीत आणि करड्या रंगाची असते. पाने एका आड एक, संयुक्त, हुबेहूब करंजीच्या पानांसारखी दिसतात. पर्णिका सात, हिरव्यागार चकचकीत, अंडाकृती-लंबगोलाकार असतात. फुले द्विलिंगी, अनियमित, पाच ते 6-8 मि. मी. आकाराची, गुलाबी लाल रंगाची, काहीवेळा फिकट जांभळ्या रंगाची, फुले पानांच्या बगलेतून लोंबणाऱ्या तुऱ्यांमध्ये येतात. फळे शेंगवर्गीय असून, शेंगा पाच ते सात सें. मी. लांब, चपट्या असून, फिकट तपकिरी रंगाच्या असतात.
advertisement
कुठे आढळतो हा वृक्ष?
हा विदेशी वृक्ष असून त्याचे मूळस्थान आहे म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम, अनेक देशात सुंदर फुलांसाठी या वृक्षाची लागवड बागांमध्ये करण्यात आली आहे. या वृक्षाला फुलांचा बहर जानेवारी ते एप्रिल या कालावधीत येतो. या वृक्षाचे लाकूड टणक व टिकाऊ असल्याने फर्निचर तयार करण्यासाठी लाकडाचा वापर करतात. याच्या पानांमध्ये सूक्ष्मजंतू विरोधी गुणधर्म आहेत. या वृक्षाच्या बियांपासून रोपे तयार करता येतात. या वृक्षाचे लाकूड टणक, टिकाऊ असल्याने फर्निचर तयार करण्यासाठी वापरतात. याच्या पानांमध्ये सूक्ष्मजंतू विरोधी गुणधर्म आहेत. तसेच या फुलांपासून रंगाची निर्मिती देखील प्रयत्न चालू आहे.
advertisement
view comments
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
March 15, 2025 9:12 PM IST
मराठी बातम्या/कोल्हापूर/
आजपर्यंत तुम्ही असं झाड कधीच पाहिलं नसेल! कोल्हापुरात दुर्मिळ वृक्षाची चर्चा VIDEO

