कोल्हापुरी चप्पल नव्हे तर सँडल पण लय भारी, महिलांना संकटात वाचवणार!

Last Updated:

या शोधामुळे महिला अत्याचार आणि अपहरणाच्या घटनांपासून सुरक्षित राहू शकतात. हे सँडल राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करण्यात यशस्वी ठरले आहे.

+
विद्यार्थिनींनी

विद्यार्थिनींनी बनवले सेफ्टी सॅंडल

निरंजन कामत, प्रतिनिधी 
कोल्हापूर : महिलांच्या सुरक्षितता आता एक महत्त्वाचा मुद्दा बनलाय आणि याच संदर्भात कोल्हापुरातील म्हाकवे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक नवा आणि अभिनव उपाय सादर केला आहे. त्याला विद्यार्थ्यांनी 'सेफ्टी सँडल'असं नाव दिलंय. जो महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो. या शोधामुळे महिला अत्याचार आणि अपहरणाच्या घटनांपासून सुरक्षित राहू शकतात. हे सँडल राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करण्यात यशस्वी ठरले आहे.
advertisement
आजकाल महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही 'सेफ्टी सँडल' महिलांसाठी एक उपयुक्त सुरक्षा साधन ठरू शकते. या सँडलमध्ये एक विशेष बटण आहे, जे संकटाच्या वेळी सक्रिय करून महिलेच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मदतीचा कॉल पाठवू शकते. यामध्ये एक सिम कार्ड आणि जीपीएस ट्रॅकर असतो, ज्यामुळे महिला तिच्या स्थानाची माहिती कुटुंबीयांना देऊ शकते. या संदर्भात विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
जर महिला संकटात असताना तिचा मोबाईल फोन बंद झाला असेल, तरीही हे सँडल तिच्या सुरक्षिततेसाठी मदत करू शकते. महिलेला जर अपहरण करण्यात आले असेल, तर सँडलमधील सिम कार्डवरून तिच्या घरच्यांना कॉल प्राप्त होऊ शकतो आणि त्यांना महिला कुठे आहे याचा शोध घेता येतो. यामुळे महिलेचा शोध घेण्यात आणि तिची सुरक्षा सुनिश्चित करण्यात मदत होऊ शकते.
advertisement
ही यंत्रणा विद्यार्थिनीं सोनाली पाटील, प्रियांका पाटील, आणि शुभश्री डाफळे यांनी तयार केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनासाठी शिक्षक युवराज पाटील यांचा महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून या उपकरणाने कोल्हापुर जिल्ह्यात प्रथम आणि राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या यशामुळे शाळेचे सर्व स्तरावर कौतुक झाले आहे.
'सेफ्टी सँडल' एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वपूर्ण साधन ठरू शकते. महिलांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे आणि या यंत्रणेचा वापर संकटाच्या वेळी महिलांना सुरक्षितता प्रदान करू शकतो. यामुळे गुन्हेगारांचा शोध घेण्यास मदत होईल आणि महिलांना सुरक्षितता मिळवून देण्यास एक प्रभावी उपाय ठरेल.
advertisement
या विद्यार्थ्यांच्या शोधामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की, तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजातील समस्या सोडवण्यासाठी युवा पिढी मोठा योगदान देऊ शकते. महिलांच्या सुरक्षेसाठी या सँडलचा वापर भविष्यात अधिक वाढवला जाऊ शकतो आणि हे एक महत्त्वपूर्ण सामाजिक साधन म्हणून वापरले जाऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापुरी चप्पल नव्हे तर सँडल पण लय भारी, महिलांना संकटात वाचवणार!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement