PM Modi : 'देशाच्या विकासाची गोष्ट करताच काँग्रेसच्या प्रिन्सला..' मोदींची लातूरमधून राहुल गांधींवर बोचरी टीका

Last Updated:

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज लातूरमध्ये जनआशीर्वाद सभा पार पडली. या सभेतून मोदींनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला.

News18
News18
लातूर, (नितीन बनसोडे, प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा राज्यात झंझावाती दौरा सुरू आहे. एकाच दिवशी 3-3 सभा मोदी घेत आहेत. आज (मंगळवार) मोदी यांची लातूरमध्ये जनआशीर्वाद सभा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सभेला उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या लातूरकरांचा माझा नमस्कार, असे म्हणत नरेंद्र मोदी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यावेळी मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
ही छत्रपती शिवाजी महाराज यांची माती आहे. शिवाजी महाराज हे आपली प्रेरणा आहेत. त्यांना जेव्हा राज्यकारभार करण्याची संधी मिळाली त्यावेळी ते देखील आराम करू शकले असते. मात्र, त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी निरंतर पुढे जाण्याचा मार्ग अवलंबला. त्यांना स्वतःची चिंता नव्हती, त्यांना केवळ देशाची चिंता होती. तशीच ही निवडणूक देखील केवळ सुधाकर शृंगारे यांना खासदार बनवण्याची नाही. त्यापेक्षाही या निवडणुकीचे ध्येय मोठे आहे. या निवडणुकीचे लक्ष मोठे आहे. त्यामुळे सुधाकर श्रृगांरे यांच्या सारख्या सहकाऱ्यांचे संसदेमध्ये पोहोचणे आणि नरेंद्र मोदी यांना मजबूत करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
advertisement
मी एक बोललो तर काँग्रेसच्या प्रिंसला ताप येतो. काँग्रेसने तुम्हाला लुटण्याचा प्लान बनवला आहे, ते तुमच्या संपत्तीवर कब्जा करून आपल्या वोट बँकेला वाटणार असल्याचा आरोप मोदी यांनी केला. तुमच्या लेकरांसाठी कमावलेल्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे. ते म्हणतात तुम्ही जे कमवाल ते तुमच्या लेकरांना देऊ शकणार नाही. तुमच्या 55% कमाईवर ते पंजे मारतील. काँग्रेसच्या शाही परिवाराने विरासतमध्ये त्यांना खुप मोठी संपत्ती ठेवली आहे. प्रत्येक क्षेत्रात विकासाची बातमी आमच्या काळात वाचायला, पाहायला मिळते.
advertisement
तरुणांनी गुगलवर जाऊन बघा 2014 च्या आधीच्या बातम्या वाचा. आणि मोदी आल्यानंतर बघा देश तर तोच आहे, त्यावेळी बातम्या यायाच्या दिल्लीत बॉम्बब्लास्ट, मुंबईत बॉम्बब्लास्ट, दहशतवादी हल्ले. आता भारत घरात घुसुन मारतोय. सर्जिकल स्ट्राइक आम्ही केलं. काँग्रेसच्या काळात रोज नवीन घोटाळ होत होते. मात्र, आज बातम्या येतात आज इथे लाखो रुपये मिळाले, तिथे धाड पडली. हे काम मी केले. ज्यांनी देश लुटाला त्यांना वापस द्यावे लागेल ही मोदीची गॅरंटी आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
PM Modi : 'देशाच्या विकासाची गोष्ट करताच काँग्रेसच्या प्रिन्सला..' मोदींची लातूरमधून राहुल गांधींवर बोचरी टीका
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement