Lemon Rate: पितृपक्षात लिंबाचा आंबटपणा वाढणार? एका लिंबाची किंमत 10 ते 20 रुपये होण्याची शक्यता
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Lemon Rate: पितृपक्षात लिंबाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश विसर्जनापूर्वीच लिंबाची खरेदी केली तर फायदा होईल.
मुंबई: हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला फार महत्त्व आहे. गणपती विसर्जनानंतर म्हणजेच अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष सुरू होतो. यंदा 7 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होणार आहे. यंदा तृतीया आणि चतुर्थी या तिथीचे श्राद्ध एकाच दिवशी आहेत. यापार्श्वभूमीवर लिंबाचे दर कडाडण्याची शक्यता आहे. पितृपक्षात विविध धार्मिक विधींसाठी आणि जेवणात देखील लिंबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
पितृपक्षात श्राद्धासाठी लिंबू आणि इतर पदार्थ जास्त प्रमाणात वापरले जातात. त्यामुळे या पंधरवड्यात लिंबाला मागणी वाढते. हा काळ पावसाचा असल्याने काही वेळा लिंबाचा पुरवठा कमी होतो. परिणामी एका नगामागे 10 ते 20 रुपये मोजायला लागू शकतात. हंगामानुसार लिंबाची उपलब्धता कमी-जास्त होते, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे पितृपक्षाच्या अगोदरच लिंबाची खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
उन्हाळ्यात लिंबाचे दर 200 रुपये किलोपर्यंत गेले होते. सध्या लिंबाचा किरकोळ बाजारभाव 40 ते 50 रुपये प्रति किलो आहे. तीन ते पाच नग लिंब दहा रुपयांना विकले जात आहेत. लिंबाचे व्यापारी म्हणाले, "पावसाळा, अधिक उत्पादन आणि कमी मागणी यामुळे सध्या लिंबाचे दर कमी झाले आहेत. मान्सूनपूर्व काळात लिंबाचं भरपूर उत्पादन झालं. त्यातुलनेत मागणी घटली आहे. मात्र, पितृपक्षात लिंबाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे."
advertisement
लिंबू आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. त्यामध्ये नैसर्गिक व्हिटॅमिन 'सी' असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. लिंबू सर्दी- खोकल्यावर प्रभावी असून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते. त्वचेसाठी गुणकारी आणि पचनसंस्थेला लिंबामुळे मदत होते. हेल्थ कॉन्शिअस असलेल्या लोकांमध्ये सध्या फ्रोजन लिंबाची क्रेझ वाढली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 10:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Lemon Rate: पितृपक्षात लिंबाचा आंबटपणा वाढणार? एका लिंबाची किंमत 10 ते 20 रुपये होण्याची शक्यता