Brahmos ची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या निशांत अग्रवालची जन्मठेप रद्द
- Published by:Prachi Amale
Last Updated:
हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात झालेल्या सुनावणी मध्ये निशांत अग्रवालला दिलासा मिळाला असून जन्मठेप रद्द करत तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे
नवी दिल्ली: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा ब्राह्मोस एअरोस्पेस कंपनीचा अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल याला हेरगिरी प्रकरणात 2018 साली लखनऊ ATS ने नागपुरातून अटक केली होती. आधी न्यायालयाने अग्रवालला जन्मठेप शिक्षा सुनावली होती, आज हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात झालेल्या सुनावणी मध्ये निशांत अग्रवालला दिलासा मिळाला असून जन्मठेप रद्द करत तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
- नागपूर खंडपीठामध्ये दाखल केलेल्या जन्मठेप शिक्षेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली न्यायालयाने शिक्षा रद्द करत तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. नागपूर खंडपीठात न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर आणि प्रवीण पाटील यांचे न्यायपीठात सूनवणी पार पडली यात तीन वर्षांचा सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे. निशांत अग्रवाल हा नेहरूनगर, रुडकी, जि. हरिद्वार (उत्तराखंड) येथील मूळ रहिवासी आहे .तो भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस एअरोस्पेस कंपनीच्या नागपूर प्रकल्पामध्ये सिस्टम इंजिनिअर पदावर कार्यरत होता. त्याला जन्मठेप 14 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या विरोधात तो न्यायालयात गेला होता.आज त्याला न्यायालयातून शिक्षा कमी केल्यानं दिलासा मिळाला आहे.
advertisement
नेमकं काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस) व लष्करी गुप्तचर संस्थेच्या (एमआय) पथकाने निशांतला आठ ऑक्टोबर 2018 रोजी त्याला अटक केली होती. निशांत ब्रह्मोस एरोस्पेसच्या नागपूर युनिटमध्ये 2014 पासून सीनियर सिस्टिम इंजिनीअर म्हणून काम करीत होता. या काळात त्याला नेहा शर्मा व पूजा रंजन या नावाने फेसबुक रिक्वेस्ट आल्या. त्याने त्या स्वीकारल्या व तो हनी ट्रॅपमध्ये अडकला. या खात्यांच्या माध्यमातून निशांतकडील ब्रह्मोसबाबतची गोपनीय माहिती फुटल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला अटक केल्याचे सांगण्यात आले. निशांतच्या खासगी लॅपटॉपवर ब्रह्मोसबाबची गोपनीय माहिती होती. नेहा शर्मा व पूजा रंजन या खात्यांवरून त्याला विदेशात नोकरी देण्याचे आमीष दाखविण्यात आले. ही दोन्ही खाती पाकिस्तानातील इस्लामाबाद येथून ऑपरेट होत असल्याचे पुढे तपासात समोर आले होते.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 01, 2025 4:16 PM IST


