Maharashtra Exit Poll : कांदा करणार महायुतीचा वांदा? एक्झिट पोलमध्ये असं आहे उत्तर महाराष्ट्राचं चित्र
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. देशातलं सगळ्यात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातल्या 48 जागांचे आकडे समोर आले आहेत.
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. देशातलं सगळ्यात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातल्या 48 जागांचे आकडे समोर आले आहेत. उत्तर महाराष्ट्रात महायुतीला 4 ते 6 तर महाविकासआघाडीला 0 ते 2 जागा मिळण्याची अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातल्या लढती
नंदूरबार- हिना गावित (भाजप) विरुद्ध गोवाल पाडवी (काँग्रेस)
जळगाव- स्मिता वाघ (भाजप) करण पवार (शिवसेना उ.बा.ठा.)
रावेर- रक्षा खडसे (भाजप) विरुद्ध श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
शिर्डी- सदाशिव लोखंडे (शिवसेना) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उबाठा)
धुळे- सुभाष भामरे (भाजप) विरुद्ध शोभा बच्छाव (काँग्रेस)
दिंडोरी- भारती पवार (भाजप) विरुद्ध भास्करराव भगरे, (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
advertisement
नाशिक- हेमंत गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे ( शिवसेना उ.बा.ठा.)
महायुती महाविकासआघाडीवर वरचढ
नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 20 ते 22 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष राहील, तर शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागा मिळू शकतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1 जागा मिळेल, असा अंदाज आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळू शकतात. यात काँग्रेसला 6 ते 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 3 ते 6 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
advertisement
नरेंद्र मोदींची हॅट्रिक
न्यूज 18 च्या या मेगा एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी हॅट्रिक करताना दिसत आहेत. एनडीएला 543 पैकी 355 ते 370 जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला 125 ते 140 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. याशिवाय इतर पक्षांना 42 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
June 02, 2024 5:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Exit Poll : कांदा करणार महायुतीचा वांदा? एक्झिट पोलमध्ये असं आहे उत्तर महाराष्ट्राचं चित्र