Shivsena : उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं, एकनाथ शिंदेंना जबर धक्का
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पहिले कल हातात यायला सुरूवात झाली आहे. देशभरात भाजप प्रणित एनडीएला सुरूवातीच्या कलांमध्येच बहुमत मिळताना दिसत आहे, पण महाराष्ट्रात मात्र कांटे की टक्कर बघायला मिळत आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पहिले कल हातात यायला सुरूवात झाली आहे. देशभरात भाजप प्रणित एनडीएला सुरूवातीच्या कलांमध्येच बहुमत मिळताना दिसत आहे, पण महाराष्ट्रात मात्र कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप 19 जागांवर आघाडीवर आहे तर शिवसेना 5 जागांवर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर आघाडीवर आहे. तर महाविकासआघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना 10 जागांवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 7 जागांवर आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रात सुरूवातीच्या फेऱ्यांनंतर महायुती 25 जागांवर तर महाविकासआघाडी 20 जागांवर आघाडीवर आहे.
महाराष्ट्राचे आजचे निकाल म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची अग्निपरीक्षा आहे, या अग्निपरिक्षेत कोण पास होणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना 21 जागा लढत आहे तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 15 जागांवर लढत आहे.
महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने कल
नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 20 ते 22 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष राहील, तर शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागा मिळू शकतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1 जागा मिळेल, असा अंदाज आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळू शकतात. यात काँग्रेसला 6 ते 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 3 ते 6 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2024 9:09 AM IST