Vantara on Madhuri Elephant :माधुरी फक्त एक हत्तीण नाही, ती भक्तीचं प्रतीक; आम्ही तिचे रक्षक- वनताराचे प्रसिद्धी पत्रक जारी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Vantara on Madhuri Elephant : कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीचे वनतारा येथे स्थलांतर कोर्टाच्या आदेशानुसार झाले. वनताराने अधिकृत पत्रकात न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई/कोल्हापूर: गेल्या काही दिवसात कोल्हापूरसह संपूर्ण राज्यभरात महादेवी (माधुरी) हत्तीणीच्या स्थलांतराचा विषय चर्चेत आला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर या हत्तीणीचे वनतारा येथे स्थलांतर करण्यात आले होते. कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीची गुजरातमधील वनतारामध्ये रवानगी करण्यात आल्यानंतर लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता या प्रकरणी वनताराने प्रथमच अधिकृत पत्रक जारी करून या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे.
महादेवी (माधुरी) हत्तीणीच्या स्थलांतराबाबत वनताराने 2 ऑगस्ट 2025 रोजी याबाबत अधिकृत पत्रक काढले आहे. हे पत्रक पुढील प्रमाणे...
View this post on Instagram
advertisement
कोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ मधून अलिकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी (माधुरी) हत्तीणीसोबत असलेल्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वनतारा खूप आदर बाळगते. आम्ही ओळखतो की तिथे उपस्थिती केवळ प्रतीकात्मक नव्हती, तर अनेकांसाठी पवित्र होती.
आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केली नाही. ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत करण्यात आली. ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. आम्ही या स्थलांतराचे आरंभकर्ता नव्हेत, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे.
advertisement
माधुरी हिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच आमचा एकमेव हेतू राहिला आहे. हिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीने आणि कायदेशीर तसेच नैतिक निकषांचे काटेकोर पालन करत पार पाडली गेली.
जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबत मनापासून सहानुभूती बाळगतो. म्हणूनच, करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून, आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरु केला आहे. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व शक्य तपासत आहोत. ज्या द्वारे शांततामय मार्गे माधुरी च्या कल्याणसोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल.
advertisement
वनतारा कोणताही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा जीवांच्या सेवेसाठी आहोत, जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत. आम्ही पारदर्शकतेस, कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहोत.
आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही, तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारांसाठी आम्ही त्यांच्यासोबत उभे राहण्याचे विनम्र आवाहन करतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 9:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vantara on Madhuri Elephant :माधुरी फक्त एक हत्तीण नाही, ती भक्तीचं प्रतीक; आम्ही तिचे रक्षक- वनताराचे प्रसिद्धी पत्रक जारी