Maharashtra Election : मोठी बातमी! अजित पवार प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, कारण काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
उपमुख्यमंत्री अजित पवार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी पोहोचले. भोसले नगरमधील प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी अजित पवार दाखल झाले आहे.
मुंंबई : आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे दोन आठवड्यांपेक्षा कमी दिवस उरले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी पोहोचले. भोसले नगरमधील प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी अजित पवार दाखल झाले आहे. अजित पवार नेमकी प्रकाश आंबेडकरांची नेमकी भेट का घेत आहेत? याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला आहे.यावेळी बोलताना अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली आहे. त्यांची तब्येत आता बरी आहे आणि ते ९ तारखेपासून प्रचाराला सुरूवात करणार आहेत, अशी माहिती अजित पवारांना दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्री. प्रकाशजी आंबेडकर यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. श्री. आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर बरे होऊन जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.@Prksh_Ambedkar pic.twitter.com/a3nXqVyYAw
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 7, 2024
advertisement
अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला आहे.यावेळी बोलताना अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली आहे. त्यांची तब्येत आता बरी आहे आणि ते ९ तारखेपासून प्रचाराला सुरूवात करणार आहेत, अशी माहिती अजित पवारांना दिली आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, आमच्या इतर काही गप्पा झाल्या नाही. या गप्पा अर्ज माघारी घेण्याआधी होण्याची शक्यता असते.पण मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
advertisement
आम्ही तिघे भाऊ भाऊ आणि सगळा महाराष्ट्र मिळून खाऊ अशी ठाकरेंनी महायुतीवर टीका केली होती.यावर ही टीका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर केली आहे.आणि जर ठाकरेंना वाटतय ना आम्ही खालंय तर त्यांनी पुरावे द्यावे, असे आव्हान अजित पवारांनी ठाकरेंनी दिले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 07, 2024 3:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election : मोठी बातमी! अजित पवार प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, कारण काय?