Maharashtra Election : अजितदादांनी शरद पवारांच्या उमेदवाराला दिला दम, म्हणाले, सगळी अंडी पिल्ली...

Last Updated:

आमच्यावर राज्याला कर्जबाजारी केलं असा आरोप करताय. पण आम्ही महिलांना 1500 रूपये दिले. तुम्ही सत्तेत असताना 1.50 रुपया पण नाही दिला, असा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला.

सुनील टिंगरेंच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते.
सुनील टिंगरेंच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते.
पुणे : पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरूद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लढत होणार आहे. या मतदार संघातून अजित पवार गटातून सुनील टिंगरे आणि शरद पवार गटाकडून बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान आज टिंगरेंच्या प्रचारासाठी वडगाव शेरीत येऊन अजित पवारांनी शरद पवारांचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सज्जड दम दिला आहे.
सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी बापूसाहेब पठारे यांना टार्गेट केलं. आज या ठिकाणी काही जणांवर दबाव टाकला जातोय...अरे आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? मी पणं पुण्याचा पालकमंत्री आहे... आरेला कारे आम्हालाही करता येते. तसेच इकडच्याला आमदार मीच केलं होत. सगळी अंडी पिल्ली मला माहिती आहे.ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी...लक्षात ठेवा, अशा शब्दात अजित पवारांनी बापूसाहेब पठारे यांनी सज्जड दम दिला आहे.
advertisement
तसेच आमच्यावर राज्याला कर्जबाजारी केलं असा आरोप करताय. पण आम्ही महिलांना 1500  रूपये दिले. तुम्ही सत्तेत असताना 1.50 रुपया पण नाही दिला, असा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला. लाडकी बहीण योजना बंद करायला कोर्टात गेले. आणि आमचं सरकार आलं की 2000 देऊ म्हणाले पण तुमचं सरकार कसं येणार? असा सवाल अजित पवारांनी करत माझं जाहीर आव्हान आहे की महाराष्ट्राला फसवू नका वडगाव शेरीकरांनो आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी कामं केली जातील.आपण नीट वागलो तर आपल्याला २ आमदार मिळतील, एक सुनील, एक जगदीश असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election : अजितदादांनी शरद पवारांच्या उमेदवाराला दिला दम, म्हणाले, सगळी अंडी पिल्ली...
Next Article
advertisement
Eknath Shinde Shiv Sena:  महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय सांगतात
महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय
  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

View All
advertisement