Maharashtra Election : काँग्रेसचा बंडखोरांवर कारवाईचा बडगा, पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
काँग्रेसने देखील बंडखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. काँग्रेसने बंडखोर नेत्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन केले आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही आघाड्यांनी तयारी सूरू केली आहे. या दरम्यान नुकतंच भाजपने बंडखोरी करणाऱ्या नत्यांवर कारवाई केली होती.त्यानंतर आता काँग्रेसने देखील बंडखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. काँग्रेसने बंडखोर नेत्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन केले आहे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी याबाबतची माहिती दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली आहे.या बैठकीतन रमेश चेन्निथला यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी बंडखोरांचे पक्षातून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आल्याची माहिती दिली.तसेच राज्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही आहे, असे देखील चेनिथला यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच महाविकास आघाडीचा जाहिरनामा येत्या १० नोव्हेंबरला मल्लिकार्जुन खऱगे यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. ह्यात हॉटेलमध्ये हा जाहीरनामा जाहीर होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रमेश चेन्निथल्ला यांनी दिली.
advertisement
याचसोबत रमेश चेन्निथल्ला यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या महाराष्ट्रातल्या प्रचाराच्या तारखा देखील सांगितल्या आहेत. प्रियंका गांधी १३ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबरला निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. तर राहुल गांधी हे ४ दिवस राज्यातील प्रचारात सहभागी होणार आहेत. राहुल गांधी १२ नोव्हेंबर, १४ नोव्हेंबर आणि १६ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. तसेच मल्लिकार्जुन खरगे हे 13-14-17-18 नोव्हेंबरला राज्यात प्रचार करणार आहेत, अशी माहिती रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान काँग्रेसने पर्वती विधानसभा मतदार संघातून आबा बागुल, कसबा मतदार संघातून कमल व्यवहारे, शिवाजी नगर मतदार संघातून मनीष आनंद या नेत्यांचवर कारवाईचा बडगा उगारला आहे.आणि त्यांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 07, 2024 1:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election : काँग्रेसचा बंडखोरांवर कारवाईचा बडगा, पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन











