नागपुरात सापडलेले 1,50,00,000 कुणाचे? निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांच्या हाती मोठं घबाड
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक अज्ञात आरोपी बॅगेतून मोठी रक्कम घेऊन जाणार असल्याची टिप पोलिसांना मिळाली होती.
नागपुर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकीकडे सभांचा धडाका सूरू आहे.तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यात पैसे सापडल्याच्या घटना घडतायत.कधी व्हॅनमध्य़े तर कधी कारमध्ये पैसे सापडल्याच्या या घटना उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे ही छोटी मोठी रक्कम नाही आहे, तर कोटींच्या घरात ही रक्कम सापडते आहे. आता अशीच रक्कम नागपुरात पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी तब्बल 1 कोटी 35 लाखाची रक्कम ताब्यात घेतली आहे. यासह एका आरोपीला अटक केली आहे.आता हे पैसे निवडणुकीत वाटप करण्यासाठी नेले जात होती की इतर काही कारण याचा तपास पोलीस करीत आहेत.
नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक अज्ञात आरोपी बॅगेतून मोठी रक्कम घेऊन जाणार असल्याची टिप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी नागपुरच्या सेंट्रल अव्हेन्यू रोडवर मोपडवरून बँगेतून रक्कम घेऊन जात असताना एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. या व्यक्तीचे नाव शाबीर खान हाजी नासिर खान असे होते.
advertisement
पोलिसांनी शाबीर खानला ताब्यात घेत त्याच्याजवळील बँकेची तपासणी केली. यावेळी बँगेतून पोलिसांच्या 1 कोटी 35 लाखाची रक्कम हाती लागली. पोलिसांनी या रक्कमेबाबत शाबीरला विचारले असता त्याने या रक्कमेबाबत समाधानकारक उत्तर दिलं नाही. तसेच तो पोलिसांनी उडवा उडवीचे उत्तर देत होता. त्यामुळे पोलिसांनी रक्कम ताब्यात घेत निवडणुकीच्या काळातील नियमाप्रमाणे निवडणूक विभागाकडे सादर केली आहे.
advertisement
प्राथमिक माहितीनुसार ही रक्कम एका बांधकाम व्यावसायिकाकडे जात होती. मात्र बँगेतल्या या पैशाचा तपशील देता न आल्याने ती ताब्यात घेतली आहे.आता ही रोकड नेमकी कोणाची यासंदर्भात चौकशी सुरू आहे. या घटनेने नागपुरात एकच खळबळ माजली आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
November 14, 2024 12:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नागपुरात सापडलेले 1,50,00,000 कुणाचे? निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांच्या हाती मोठं घबाड


