Sanjay Raut : 'पंतप्रधान मोदींनी छातीवर हात ठेवून सांगावं शिवसेना...',संजय राऊतांच चॅलेंज

Last Updated:

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर पुढील सहा महिन्यात दिल्लीतील मोदी सरकार डळमळीत होईल.

संजय राऊतांच पंतप्रधान मोदींना आव्हान
संजय राऊतांच पंतप्रधान मोदींना आव्हान
Sanjay Raut News : दादरच्या शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे.या सभेपुर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चँलेंज दिले आहे. शिवसेना फोडली की नाही? हे पंतप्रधान मोदींनी आजच्या सभेत छातीवर हात ठेवून सांगाव, असं आव्हान संजय राऊतांनी दिले आहे.
संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. भाजपा हा जाहिरात बजरंग चालणारा पक्ष आहे. 2014 मध्ये अशाच पद्धतीचे जाहिराती करून त्यांनी यश संपादन केले होते, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला. तसेच मोदींनी मागील दहा वर्षात असं काही केलेले नाही की त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतील आम्हाला तरी तसे देशात काहीच दिसले नाही, अशा चिमटा देखील राऊतांनी काढला आहे.
advertisement
जो देश पंडित नेहरू इंदिरा गांधी यांनी घडविला. त्या देशाला मोदींनी मागील दहा वर्षात मागे नेले. तसेच मागील दहा वर्षात काय केलं याची उजळणी करण्याची संधी जर आम्हाला दिली तर बर होईल,असे देखील राऊत यांनी म्हटलं आहे.मोदींनी आजच्या सभेत छातीवर हात ठेवून सांगायचं की मुंबईचा आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली की नाही, असे चँलेज राऊतांनी पंतप्रधान मोदींना दिले आहे.
advertisement
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर पुढील सहा महिन्यात दिल्लीतील मोदी सरकार डळमळीत होईल. म्हणूनच मोदी अमित शहा यांच्यासह अख्ख केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरते आहे,अशी टीका देखील राऊतांनी केली.
दरम्यान शिवाजी पार्कवरील मैदानावर 17 तारखेला सभा घेण्याची परवानगी मनसेला मिळाल्यची माहिती आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 17 तारखेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृति दिवस आहे. शिवतीर्थावर दरवर्षी लाखो लोक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात त्यामुळे त्या दिवशी शिवतीर्थ मैदान सभेसाठी आम्हालाच मिळाला पाहिजे आणि प्रशासनाने देखील याबाबत आम्हाला सहकार्य करावे,असे आवाहन राऊत यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : 'पंतप्रधान मोदींनी छातीवर हात ठेवून सांगावं शिवसेना...',संजय राऊतांच चॅलेंज
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement