Maharashtra Election : ज्याची चर्चा होती तेच झालं, वरळीत ठाकरेंचा शिंदे गटाला मोठा धक्का

Last Updated:

शिंदे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेना युबीटीत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

वरळीत शिंदे गटाला मोठा झटका
वरळीत शिंदे गटाला मोठा झटका
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असतानाच वरळी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.कारण शिंदे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना युबीटीत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिंदे गटाच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखा प्रमुख संतोष शिंदे, शाखाप्रमुख श्रीकांत जावळे, अनवर दुर्रानी (शिंदे गट) यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मातोक्षीवर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशाने शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
खरं तर वरळी मतदार संघातून महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर मनसेने या मतदार संघातून संदीप देशपांडे यांना तिकीट दिलं होतं. आणि एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. पण वरळीत शिंदे गटातून स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी जोर धरत होती. आणि आदित्य ठाकरे वगळता शिंदे आणि मनसेचे उमेदवार हे आयात उमेदवार होते.याच कारणामुळे आता शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युबीटीत प्रवेश केला आहे.
advertisement
दरम्यान वरळीमधून आदित्य ठाकरेंना मनसेचे संदीप देशपांडे आणि शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांचे तगडे आव्हान असणार आहे.दोन्ही ही ताकदीचे उमेदवार आहेत. संदीप देशपांडेचे नाव तर उमेदवारी यादी आधीच राज ठाकरेंनी वरळीच्या व्हिजनमध्ये सभेत जाहीर केले होते. यावरून ते आदित्य ठाकरेंविरूद्ध किती तयारीने उतरले होते.हे स्पष्ट होते. त्याचसोबत शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा हे देखील सुशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंसमोर या उमेदवाराचे तगडं आव्हान असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election : ज्याची चर्चा होती तेच झालं, वरळीत ठाकरेंचा शिंदे गटाला मोठा धक्का
Next Article
advertisement
Eknath Shinde Shiv Sena:  महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय सांगतात
महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय
  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

View All
advertisement