Eknath Shinde: खरी शिवसेना कुणाची एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिलं ठाकरेंना जळजळीत उत्तर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Eknath Shinde on Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहे.
Eknath Shide News : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहे. त्याचसोबत महाविकास आघाडीच्या प्रचारात एकनाथ शिंदे यांच्या गटाला गद्दार म्हणून हिणवणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी जोरदार उत्तर दिले आहे.तसेच खरी शिवसेना कुणाची? यावर देखील एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
खरं तर लोकसभेपासून आता विधानसभेपर्यंत खरी शिवसेना कुणाची? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. हे प्रकरण कोर्टात देखील पोहोचले होते. मात्र यावर निवडणुकीआधी काही निर्णय येऊ शकला नव्हता.त्यामुळे हा प्रश्न जनतेच्या मनात प्रलंबित होता.अखेर यावर आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. खरी शिवसेना कुणाची हे आता लोकांनी ठरवलं आहे,असे एका वाक्यात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
advertisement
एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे. हे आता लोकांनी ठरवलं आहे. 2019 ला 56 जागा जिंकल्या होत्या आणि आताही 56 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे मला समाधान वाटतंय, असे शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही आरोपांना उत्तर देत बसलो नाही. आम्ही लोकांमध्ये गेलो.विकासाला लोकांनी मत दिलं आहे. घरी बसून सरकार चालवता येत नाही, फेसबूकवरून सरकार चालवता येत नाही,असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना चिमटा काढला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2024 4:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde: खरी शिवसेना कुणाची एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिलं ठाकरेंना जळजळीत उत्तर


