Maharashtra Elections Ajit Pawar NCP Candidate List : अजितदादांची पहिली यादी जाहीर, कोणते आमदार गॅसवर, 'या' मतदारसंघाचे उमेदवार वेटिंग लिस्टवर

Last Updated:

Maharashtra Elections Ajit Pawar NCP First List : अजित पवार गटातील काही आमदार वेटिंग लिस्टवर आहेत. काही दिवसांपूर्वी एबी फॉर्म मिळालेले सुनील टिंगरे यांचे यादीत नाव नसल्याचे समोर आले आहे.

 अजितदादांची पहिली यादी जाहीर, 'या' मतदारसंघाचे आमदार गॅसवर, उमेदवारीवर प्रश्न!
अजितदादांची पहिली यादी जाहीर, 'या' मतदारसंघाचे आमदार गॅसवर, उमेदवारीवर प्रश्न!
मुंबई :  भाजप, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत अजित पवार गटाने विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. पण अजित पवार गटातील काही आमदार वेटिंग लिस्टवर आहेत. काही दिवसांपूर्वी एबी फॉर्म मिळालेले सुनील टिंगरे यांचे यादीत नाव नसल्याचे समोर आले आहे. तर, नवाब मलिक यांचेही नाव जाहीर करण्यात आले नाही.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत यादी जाहीर केली. संसदीय मंडळाच्या सदस्यांची बैठक झाली. आज काही जागांवरील उमेदवार घोषित करण्यात येत आहेत असं तटकरे यांनी म्हटले.

उमेदवार जाहिर न झालेले मतदारसंघ

आजच्या यादीत वडगाव शेरी, शिरूर, फलटण आणि अणुशक्तीनगर या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. त्याशिवाय, राष्ट्रवादीचे मुंबईतील संभाव्य उमेदवार झिशान सिद्दिकी यांचेही नाव पहिल्या यादीत नाही. वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचे नाव जाहीर न झाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे.
advertisement

 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जाहीर केलेली पहिली यादी...

बारामती - अजित पवार
येवला - छगन भुजबळ
आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील
कागल - हसन मुश्रीफ
परळी - धनंजय मुंडे
दिंडोरी - नरहरी झिरवाळ
अहेरी - धर्मराव बाबा अत्राम
श्रीवर्धन - आदिती तटकरे
अंमळनेर - अनिल भाईदास पाटील
उदगीर - संजय बनसोडे
advertisement
अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
माजलगाव - प्रकाश दादा सोळंके
वाई - मकरंद पाटील
सिन्नर - माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते
अहमदनगर शहर - संग्राम जगताप
इंदापूर - दत्तात्रय भरणे
अहमदपूर - बाबासाहेब पाटील
शहापूर - दौलत दरोडा
पिंपरी - अण्णा बनसोडे
कळवण - नितीन पवार
कोपरगाव - आशुतोष काळे
advertisement
अकोले- किरण लहामटे
वसमत - चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळून - शेखर निकम
मावळ - सुनिल शेळके
जुन्नर - अतुल बेनके
मोहेळ - यशवंत विठ्ठल माने
हडपसर - चेतन तुपे
देवळाली - सरोज आहिरे
चंदगड - राजेश पाटील
इगतपुरी - हिरामण खोसकर
तुमसर - राजू कारेमोरे,
पुसद - इंद्रनील नाईक
advertisement
अमरावती शहर - सुलभा खोडके
नवापूर - भरत गावित
पाथरी - निर्मला विटेकर
मुंब्रा-कळवा - नजीब मुल्ला
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Ajit Pawar NCP Candidate List : अजितदादांची पहिली यादी जाहीर, कोणते आमदार गॅसवर, 'या' मतदारसंघाचे उमेदवार वेटिंग लिस्टवर
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement