Maharashtra Elections NCP SP Candidate List : शरद पवार गटाकडून अखेरच्या क्षणी उमेदवार जाहीर, पाचव्या यादीत कोणाला संधी?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections 2024 : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला आहे. त्याच्या आधी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला आहे. त्याच्या आधी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीत पंढरपूर, माढा, मुलुंड, मोहोळ या जागांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपल्या पाचव्या यादीत 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. एका जागांवर याआधीच काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहे.
पंढरपूरमध्ये मविआचे दोन उमेदवार
पंढरपूरमधून काँग्रेसने माजी आमदार भारत भालके यांचा मुलगा भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता शरद पवार गटानेदेखील अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता या जागेवरून कोणी माघार घेणार की मैत्रीपूर्ण लढत होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
advertisement
शरद पवारांच्या पाचव्या यादीत कोणाला संधी?
कृपया प्रसिद्धीसाठी...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/6idD0OGYmw
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 29, 2024
advertisement
माढा - अभिजीत पाटील
पंढरपूर - अनिल सावंत
मोहोळ - राजू खरे
मुलुंड - संगीता वाजे
मोर्शी- गिरीश कराळे
उमेश पाटलांना कात्रजचा घाट?
राष्ट्रवादी अजित पवार गटातून मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन शरद पवार पक्षाच्या संपर्कात असलेल्या उमेश पाटील यांना ही मोहोळमधून उमेदवारी देण्यात आली नाही. उमेश पाटील हे मोहोळमधून उत्सुक होते. उमेदवारीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, शरद पवारांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा सुरू आहे.
advertisement
इतर महत्त्वाची बातमी :
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 29, 2024 12:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections NCP SP Candidate List : शरद पवार गटाकडून अखेरच्या क्षणी उमेदवार जाहीर, पाचव्या यादीत कोणाला संधी?










