Maharashtra Elections 2024 : भटजी बोलावले...मंत्रोच्चारात पूजा केली... निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी आव्हाडांची देवपूजा चर्चेत

Last Updated:

Maharashtra Assembly Elections : कळवा-मुंब्राचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शास्त्रोक्त पूजा केल्यानंतर आपला निवडणूक अर्ज दाखल केला.

भटजी बोलावले...मंत्रोच्चारात पूजा केली... पवारांना उभं ठेवलं, जितेंद्र आव्हाडांनी निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी काय काय केलं?
भटजी बोलावले...मंत्रोच्चारात पूजा केली... पवारांना उभं ठेवलं, जितेंद्र आव्हाडांनी निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी काय काय केलं?
ठाणे :   विधानसभा निवडणुकीसाठी आज विविध पक्षातील उमेदवारांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केला. निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जवळपास सगळ्याच उमेदवारांनी जनतेचा आशिर्वाद मागण्याआधी आपल्या देवतांना साकडं घातले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कळवा-मुंब्राचे विद्यमान आर जितेंद्र आव्हाड यांनी शास्त्रोक्त पूजा केल्यानंतर आपला निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्रा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याआधी आव्हाडांनी सलग तीन वेळेस मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. आता चौथ्यांदा जितेंद्र आव्हाड निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यावेळी त्यांना महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नाजिब मुल्ला यांचे आव्हान असणार आहे.

आव्हाडांचा व्हिडीओ चर्चेत...

जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. अर्ज दाखल करण्याआधी जितेंद्र आव्हाड यांच्या घरी शास्त्रोक्त पूजा करण्यात आली. यावेळी भटजींच्या मंत्रोच्चारात ही पूजा पार पडली. शरद पवारदेखील यावेळी उपस्थित होते. मंत्रोच्चारात जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या निवडणूक उमेदवारी अर्ज घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. जितेंद्र आव्हाडांच्या या खास देवपूजेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
advertisement
मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा जवळपास 75 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. यंदा जितेंद्र आव्हाड यांच्या समोरील आव्हान थोडं कठीण असण्याची शक्यता आहे. मुंब्रातील नगरसेवक आणि कधीकाळी जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू समजले जाणारे नाजिब मुल्ला हे त्यांच्याविरोधात असणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : भटजी बोलावले...मंत्रोच्चारात पूजा केली... निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी आव्हाडांची देवपूजा चर्चेत
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement