Maharashtra Elections Sharad Pawar : मविआचे सरकार आल्यावर मंत्रीपदी कोणाला संधी? पवारांनी आमदाराचे नाव जाहीर केलं

Last Updated:

Maharashtra Assembly Elections Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये मोठी घोषणा केली. बीडमधील सभेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्री म्हणून कोणत्या आमदाराला संधी देणार, याचे नाव जाहीर केले.

शरद पवार
शरद पवार
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. दोन्ही बाजूंनी आश्वासनांचा वर्षाव होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी हायव्होलटेज निवडणुका होणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने दोन्ही पक्षांच्या दोन्ही गटांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये मोठी घोषणा केली. बीडमधील सभेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्री म्हणून कोणत्या आमदाराला संधी देणार, याचे नाव जाहीर केले.

पवारांनी दिला बीडकरांना शब्द...

शरद पवार यांनी बीडमध्ये पक्षाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेला संबोधित केले. त्यांनी म्हटले की, येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. सत्तेसाठी जवळचे सोडून गेले मात्र तत्वाशी तडजोड ना करता एकनिष्ठ राहिलेल्या बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना विधानसभेत पाठवा. संदीप यांना मी त्यांच्यावर आगामी सत्तेत मोठी जबाबदारी देण्याचा शब्द देतो असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी संदीप क्षीरसागर यांच्या मंत्रिपदाचे बीडकरांना आश्वासन दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारर्थ बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरील जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
advertisement

माझी साथ दिल्याने संदीप क्षीरसागरांना साथ...

यावेळी बोलताना पवार यांनी दिवंगत नेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या आठवणींना उजाळा दिला. पवारांनी म्हटले की, काकूंनी घालून दिलेल्या आदर्शवर चालण्याचं काम संदीप यांनी केलं आहे. दोन वर्षांपूर्वी पक्षात फाटफूट झाली, माझ्या घरच्या लोकांनी मला सोडलं. पक्ष फोडला मात्र बीड जिल्ह्यातून संदीपभैय्या या एकमेव तरुणाने तत्वाशी तडजोड ना करता माझी साथ दिली. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. अनेक योजना अडवल्या गेल्या. परंतु काळजी करू नका, येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, या सरकारमध्ये संदीप भैय्याला सरकारमध्ये मोठी जबाबदारी देऊन तुमच्या सेवेची संधी दिली जाईल. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सत्तेत सहभागी करून घेतले जाईल असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Sharad Pawar : मविआचे सरकार आल्यावर मंत्रीपदी कोणाला संधी? पवारांनी आमदाराचे नाव जाहीर केलं
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement