Maharashtra Elections Beed : परळीत राजकारण तापलं! धनंजय मुंडेंना अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections Dhananjay Munde : परळीत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष चांगलाच पेटला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभे ठाकलेले उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी राज्याचे मंत्री, आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडेंना आव्हान देत गंभीर आरोप केले आहेत.
परळी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना हा संघर्ष अधिक पेटला आहे. त्यामुळे परळीत वातावरण पेटलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने परळी मतदारसंघात स्वतः लक्ष घालून बूथ एजंट वर निर्बंध घालावे, मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरा छेडछाड करून बोगस मतदानाला रोख लावून मतदानाची वेब कास्टिंग करावी अशी मागणी राजसाहेब देशमुख यांनी केली आहे.
advertisement
देशमुख यांनी म्हटले की, मी मॅनेज उमेदवार असेल तर धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाच्या पिंडीवरील बेल उचलावा असे थेट आव्हान देशमुख यांनी दिले. मी मॅनेज नसून त्यांचा लाभार्थी नसल्याचेही त्यांनी म्हटले. धनंजय मुंडे हे निष्क्रिय असून त्यांचे मतदारसंघात कोणतेही काम नाही. तसेच बीड जिल्ह्याचा बिहार होत असून अधिकारी देखील याला पाठबळ देत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
advertisement
मागील विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवार आणि त्यांच्या चुलत बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. मविआ सरकारमध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. अजित पवारांनी शरद पवारांविरोधात बंड केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना साथ दिली. आता, परळीमध्ये मुंडे यांच्या पराभवासाठी शरद पवार गटाने कंबर कसली आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
Nov 18, 2024 10:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Beed : परळीत राजकारण तापलं! धनंजय मुंडेंना अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप










