Maharashtra Elections BJP Rahul Gandhi: कव्हरवर संविधान आत कोरे कागद, व्हिडीओ पोस्ट करत भाजपने काँग्रेसवर डागली तोफ
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections BJP Congress : काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे, असल्याचे सांगत भाजपने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता आरोप-प्रत्यारोपांचे फटाके जोरदार वाजू लागले आहेत. भाजप-संघामुळे संविधान धोक्यात असल्याच्या आरोपावर उत्तर देण्यासाठी भाजपने चांगलाच जोर लावला आहे. काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे, असल्याचे सांगत भाजपने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ''संविधानाच्या मारतात बाता, काँग्रेसचा एकूण विषयच खोटा'' अशा शब्दात भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे.
काँग्रेसने बुधवारी नागपुरातील सुरेश भट सभागृहात संविधान सन्मान परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधीही सहभागी झाले होते. या परिषदेदरम्यान उपस्थितांना 'भारताचे संविधान', असं लिहिलेले एक नोटपॅड देण्यात आले होते. त्याशिवाय एक बुकमार्क ही देण्यात आले. यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भाजपने ट्वीट केला व्हिडीओ...
advertisement
भाजपने या परिषदेतील 'लाल किताब'चा व्हिडीओ जारी केला आहे. या ट्वीटमध्ये काँग्रेसवर निशाणा साधताना भाजपने म्हटले की, संविधान सिर्फ बहाना है लाल पुस्तक को बढ़ाना है, मोहब्बत के नाम पर सिर्फ नफरत फैलाना है...
संविधान सिर्फ बहाना है
लाल पुस्तक को बढ़ाना है
मोहब्बत के नाम पर
सिर्फ नफरत फैलाना है...
काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही… pic.twitter.com/C94Wa3CZee
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 6, 2024
advertisement
काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती असे भाजपने आपल्या ट्वीटर हँडलवर म्हटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी कॉग्रेसला जनताच धडा शिकवेल, असेही भाजपने म्हटले.
advertisement
काँग्रेसने काय म्हटले?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर पलटवार करताना म्हटले की, संविधान सन्मान परिषदेला उपस्थित मान्यवरांना नोटपॅड आणि पेन देण्यात आले. त्याचा व्हिडिओ बनवून असे बेताल आरोप करण्यात काही अर्थ नाही. राहुल गांधी नागपुरात आले तेव्हा भाजपवाले इतके घाबरले का? संविधान आणि राहुल गांधी तुमचे खोटे वेळोवेळी उघड करतील. ही तर सुरुवात आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 07, 2024 2:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections BJP Rahul Gandhi: कव्हरवर संविधान आत कोरे कागद, व्हिडीओ पोस्ट करत भाजपने काँग्रेसवर डागली तोफ









