CM Eknath Shinde : लाडकी बहीण योजना ते मविआवर बोचरा, CM शिंदे यांच्या मुलाखतीमधील ठळक मुद्दे

Last Updated:

Maharashtra Elections 2024 CM Eknath Shinde : या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामांची यादी सादर करताना मागील महाविकास आघाडीवरही जोरदार टीकास्त्र सोडले.

लाडकी बहीण योजना ते मविआवर बोचरा, CM शिंदे यांच्या मुलाखतीमधील ठळक मुद्दे
लाडकी बहीण योजना ते मविआवर बोचरा, CM शिंदे यांच्या मुलाखतीमधील ठळक मुद्दे
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामांची यादी सादर करताना मागील महाविकास आघाडीवरही जोरदार टीकास्त्र सोडले. विधानसभेच्या रणधुमाळीतील मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच मुलाखतीत शिवसेना आणि महायुतीच्या प्रचाराची दिशा स्पष्ट केल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, महायुतीमध्ये जागा वाटपा समन्वयाने करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी विरोधकांकडून फेक नरेटिव्ह करण्यात आला. मात्र, सारखंसारखं फेक नरेटिव्ह करता येत नसल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'न्यूज18 लोकमत'ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. विरोधकांनी फक्त घोषणा केल्या. पण, राज्यातील योजनांना विरोधकांचा विरोध आहे. विरोधक या योजनेविरोधात कोर्टात गेले असल्याचा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आम्ही कल्याणकारी योजना राबवल्याचेही त्यांनी म्हटले. याआधीचे सरकार फक्त 'मेरी आवाज सुनो' असे होते, असा बोचरा वार त्यांनी केला.

बळीराजाची काळजी...

advertisement
बळीराजासाठी पीक विमा सुरू केला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारं सरकार असल्याचे त्यांनी म्हटले. आम्हाला कॉमनमॅनला सुपरमॅन करायचंय असून आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या मुलाखतीमधील ठळक मुद्दे...

- महायुतीचं जागावाटप समन्वयानं
- लोकसभेवेळी विरोधकांकडून फेक नरेटिव्ह
- फेक नरेटिव्ह सारखं चालत नाही, जनता सुज्ञ '
advertisement
- विरोधकांनी फक्त घोषणा केल्या
- राज्यातील योजनांना विरोधकांचा विरोध
- विरोधक योजनेविरोधात कोर्टात गेले
- आम्ही कल्याणकारी योजना राबवल्या
- आमचं सरकार देणारं, घेणारं नाही
- लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली
- निवडणूक झाल्यावर डिसेंबरचे पैसे देणार
- लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही
- आमची देण्याची नियत, नीती, उद्देश स्वच्छ
advertisement
- आम्ही मैदानामधून पळणारे नाही, पळवणारे लोक
- देशात आणि महाराष्ट्रात विकासाचं काम
- राज्याचा विकास म्हणजे देशाचा विकास
- समृद्धी हायवे, कोस्टल रोड, अटल सेतू बनवला
- महाराष्ट्रात इंडस्ट्रीचा वेगानं विकास
- इंडस्ट्रीमुळे राज्यात रोजगारनिर्मिती
- मुंबईत मेट्रोचं जाळं वेगानं पसरतंय
- 'अडीच वर्षात प्रकल्प बंद पडले होते, ते पुढे नेले'
advertisement
- बळीराजासाठी पीक विमा सुरू केला
- आम्हाला कॉमनमॅनला सुपरमॅन करायचंय
- आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो
- अनेक नवे रस्ते आम्ही बनवतो
- दररोज लाखो लोक मेट्रोनं प्रवास करतायत
- शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारं सरकार
- समृद्धी महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी वाढली
- एका समृद्धी महामार्गामुळे मोठा फरक पडला
- अमरावतीला टेक्सटाईल पार्क उभारलं
advertisement
- मी रेकॉर्ड सह्या केल्यात
- मी लोकांमध्ये जाऊन काम करतो
- घरात बसून लोकांची कामं होत नाहीत
- आम्ही सरकारचं रिपोर्ट कार्ड सादर केलं
- रिपोर्ट कार्ड सादर करायला हिंमत लागते
- 'गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात इंडस्ट्री पोहोचवली'
- आम्ही सकारात्मक, पॉझिटिव्ह आहोत
- लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळालंय
- लाडक्या बहिणी सावत्र भावांना जोडा दाखवणार
advertisement
- 'आमची महायुती मजबूत, निवडणुकीत महायुतीच जिंकणार'
- राज्यात महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं येणार
- 2 वर्षांतील विकासकामांची पोचपावती जनता देईल
- पूर्वीचं सरकार फक्त 'मेरी आवाज सुनो'
- आमचं सरकार ऐकणारं सरकार
- 'फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं'
- 'मविआनं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही'
- मराठा समाजानं याचा विचार करावा
- आम्ही केलेलं काम विरोधकही मान्य करतात
- मी आरोपांना कामानं उत्तर देतो
- मी पातळी सोडून कधीच बोलत नाही
- 2019 ला जनतेसोबत विश्वासघात कुणी केला?
- स्वार्थासाठी त्यांनी शिवसैनिकांचं खच्चीकरण केलं
- त्यांच्याकडे फक्त दोन-तीनच शब्द, शिंदेंचा ठाकरेंना टोला
- 'त्यांच्या बाजूनं निकाल लागला की यंत्रणा चांगली'
- विरोधात निकाल लागला की ती यंत्रणा वाईट - शिंदे
- मुलगा आहे म्हणून श्रीकांतला मंत्री केलं नाही यासाठी मन मोठं असावं लागतं
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CM Eknath Shinde : लाडकी बहीण योजना ते मविआवर बोचरा, CM शिंदे यांच्या मुलाखतीमधील ठळक मुद्दे
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement