Maharashtra Elections 2024 : मविआतील तिढा सुटणार! 'या' ठिकाणचे काँग्रेस उमेदवार घेणार माघार
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections : काँग्रेसकडून अथवा काँग्रेसच्या नेत्यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले अर्ज मागे घेण्यात येणार आहे.
सुष्मिता भदाणे, प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून सुरू असलेला तिढा उमेदवार मागे घेण्याच्या तारखेपर्यंत सुटण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काही मतदारसंघात एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्याचा तिढा सुटणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून अथवा काँग्रेसच्या नेत्यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले अर्ज मागे घेण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष बंडखोरी झालेल्या काही जागांवर माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
कोणत्या मतदारसंघातील उमेदवार घेणार अर्ज मागे?
नाशिक, भायखळा अन्य काही जागांवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार, बंडखोर माघार घेणार आहेत. आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर रोजी संपली. आता उमेदवार अर्जाची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत.
advertisement
महायुती, महाविकास आघाडीकडून किती उमेदवार?
निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे 103, शिवसेना ठाकरे गट 96, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून 87 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. महाविकास आघाडीने आपल्या मित्रपक्षांना हाताच्या बोटावर मोजण्या इतपत जागा सोडल्या. त्यामुळे मविआवर मित्रपक्ष नाराज आहेत. तर महायुतीकडून 286 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजप 152, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी 52 अशी उमेदवारांची संख्या आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 30, 2024 11:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : मविआतील तिढा सुटणार! 'या' ठिकाणचे काँग्रेस उमेदवार घेणार माघार








