Maharashtra Elections 2024 BJP : दिवाळीत भाजपने पहिला बॉम्ब फोडला, प्रचाराच्या धामधुमीत काँग्रेसचा बडा नेता गळाला
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Elections BJP : ऐन दिवाळीत भाजपने मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. प्रचाराची धामधूम सुरू होण्याआधीच भाजपने मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता गळाला लावला आहे.
मुंबई : ऐन दिवाळीत भाजपने मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. प्रचाराची धामधूम सुरू होण्याआधीच भाजपने मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता गळाला लावला आहे. मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते रवी राजा यांनी भाजपात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. रवी राजा यांनी आपला राजीनामा थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला आहे. आपण काँग्रेसमधील 44 वर्षांचा राजकीय प्रवास थांबवत असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबईमध्ये रवी राजा हे काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची चांगली कामगिरी राहिली आहे. रवी राजा हे शीव-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेस पक्षाने गणेश यादव यांना संधी दिली. त्यामुळे रवी राजा यांनी नाराजी व्यक्त केली. रवी राजा हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत. रवी राजा यांचा सायन-प्रतिक्षा नगर भागात चांगला संपर्क आहे. या ठिकाणी ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते.
advertisement
4 दशकांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत, पण...खर्गेंना पत्र
रवी राजा हे मागील 4 दशकांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. 1980 मध्ये रवी राजा यांनी युवक काँग्रेसपासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती.
Here I am submitting my resignation from @INCIndia party after serving the party for 44 years... pic.twitter.com/3e02roPJzH
— Ravi Raja (@ravirajaINC) October 31, 2024
advertisement
आपण मागील चार दशकांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहोत. पक्षासाठी झोकून काम केले. पण, पक्षाकडून त्याचा आदर ठेवण्यात आला नाही. यामुळे आपण निराश झालो असून राजीनामा देत असल्याचे रवी राजा यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 31, 2024 11:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 BJP : दिवाळीत भाजपने पहिला बॉम्ब फोडला, प्रचाराच्या धामधुमीत काँग्रेसचा बडा नेता गळाला










