Maharashtra Elections : भांडून विदर्भात अधिक जागा घेतल्या पण गणित बिघडलं, काँग्रेस नेत्याने काय म्हटले?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections : ज्या विदर्भात काँग्रेसने भांडून अधिक जागा घेतल्या, तिथेच त्यांचे राजकीय गणित चुकणार का, याची धास्ती नेत्यांना वाटू लागली आहे.
अमित उदयतिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला होता. जागा वाटपाचा तिढा हा विदर्भातील 62 जागांच्या वाटपावर अधिकच झाला होता. विदर्भातील जागांवरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये वादही झाला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात खटके उडाल्याचे वृत्त होते. अखेर काँग्रेस हायकमांडने लक्ष घालत या वादावर पडदा टाकला. मात्र, ज्या विदर्भात काँग्रेसने भांडून अधिक जागा घेतल्या, तिथेच त्यांचे राजकीय गणित चुकणार का, याची धास्ती नेत्यांना वाटू लागली आहे.
काँग्रेस नेते आणि आमदार नितीन राऊत यांनी 'न्यूज 18 लोकमत' सोबत बोलताना काही गोष्टी मान्य केल्या आहेत. जागा वाटपात काँग्रेस सोशल इंजिनिअरिंग करता आले नसल्याची खंत नितीन राऊत यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीमध्ये असल्याने सोशल इंजिनिअरिंगच्या ऐवजी इलेक्टिव्ह मेरिट हा मुद्दा लक्षात घ्यावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. या इलेक्टिव्ह मेरिटवर जागा वाटप झाल्याने सोशल इंजिनिअरिंगवर भर देता आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
तर आम्हाला निवडणुकीत फटका...
नितीन राऊत यांनी म्हटले की, तेली, हलबा, मुस्लिम या समाजाची पार्श्वभूमी असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देता आली नाही. याचा फटका आम्हाला बसू शकतो. त्यामुळे ही बाब लक्षात घेता हायकंमाडसोबत चर्चा व्हायला हवी असेही त्यांनी सांगितले. उमेदवारीत प्रतिनिधीत्व न मिळालेल्या समाजघटकांसोबत चर्चा करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. भाजप सोबत काँग्रेसची थेट लढत अनेक जागांवर होत असल्याने काँग्रेस समोर आव्हान असेल हेदेखील त्यांनी नमूद केले.
advertisement
बौद्ध समाजाचा मुख्यमंत्री हवाय...
नितीन राऊत यांनी सांगितले की, देशात आजपर्यंत बौद्ध समाजाचा मुख्यमंत्री झाला नाही. महाराष्ट्रात बौद्ध समाजाचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत महाविकास आघाडी आणि काँग्रेस हायकमांड निर्णय घेतील असेदेखील राऊत यांनी सांगितले.
view commentsLocation :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
Oct 30, 2024 12:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : भांडून विदर्भात अधिक जागा घेतल्या पण गणित बिघडलं, काँग्रेस नेत्याने काय म्हटले?










