Maharashtra Elections Kolhapur North : कोल्हापूर उत्तरमध्ये वादाचा भडका, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Last Updated:

Maharashtra Elections Satej Patil : सतेज पाटलांच्या संतापाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता, सोमवारी घडलेल्या वादाच्या प्रसंगावर सतेज पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये वादाचा भडका, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कोल्हापूर उत्तरमध्ये वादाचा भडका, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कोल्हापूर:   विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली होती. सतेज पाटलांचा राग पाहून अनेक कार्यकर्ते स्तब्ध झाले होते. या दरम्यानचा सतेज पाटलांच्या संतापाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता, सोमवारी घडलेल्या वादाच्या प्रसंगावर सतेज पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना सतेज पाटील यांनी सांगितले की, कालच्या विषयावर पडदा टाकायचा निर्णय घेतला आहे. जे घडलं त्यावर आता बोलण्याची काही आवश्यकता वाटत नाही, असेही त्यांनी म्हटले. आता त्यातून पुढे कसं जावं यासंदर्भात महाविकास आघाडीतील घटक पक्षांची चर्चा करणे आवश्यक आहे . इंडिया आघाडीचे सर्व पक्ष एकत्रित येत बैठक पार पडली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील मदत करण्याची भूमिका घेण्यात आली आहे पुढील दिशा आज संध्याकाळपर्यंत ठरेल अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement

कायमच मान गादीला...

मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर सतेज पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओ सतेज पाटील हे खासदार शाहू छत्रपती यांच्या निकटच्या सहकाऱ्याला संतापाने बोलताना दिसत आहेत. माझा विश्वासघात झाला असल्याची संतप्त भावना सतेज पाटील बोलताना दिसत आहेत. त्यावरुन विरोधकांनी टीका केली. यावर बोलताना सतेज पाटलांनी म्हटले की, मी कोणतीही वैयक्तिक टिकाटिप्पणी करणार नाही. मला आदरणीय शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे. गादीचा सन्मान ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि हा सन्मान पुढेही कायम राहिल असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शाहू महाराज यांच्याशी देखील आधी चर्चा झाली आहे. त्यांना विश्वासात घेऊन निर्णय होईल असेही सतेज पाटील यांनी म्हटले.
advertisement

वंचितच्या माघारीचा फायदा...

सतेज पाटील यांनी म्हटले की, शिरोळमध्ये वंचितने माघार घेतली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये देखील वंचितने माघार घेतली आहे. हे आम्हाला फायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले. चंदगडमध्ये आम्हाला थोडं यश आलं. मात्र जिथे शक्य आहे तिथं माघार घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील पंधरा दिवस मला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे यामुळे मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही असेही सतेज पाटील यांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Kolhapur North : कोल्हापूर उत्तरमध्ये वादाचा भडका, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement