Maharashtra Elections: विदर्भात हरियाणा पॅटर्नचे संकेत! पहिल्याच दिवशी 62 जागांसाठी 2 हजारांहून अधिक अर्ज विक्री, कोणाच्या पथ्यावर?

Last Updated:

Maharashtra Assembly Elections : राज्यातील सत्ता स्थापनेत विदर्भाची महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. या ठिकाणी हरियाणा पॅटर्नचे संकेत दिसू लागले आहेत.

विदर्भात हरियाणा पॅटर्नचे संकेत! 62 जागांसाठी 2 हजारांहून अधिक अर्ज विक्री, कोणाच्या पथ्यावर?
विदर्भात हरियाणा पॅटर्नचे संकेत! 62 जागांसाठी 2 हजारांहून अधिक अर्ज विक्री, कोणाच्या पथ्यावर?
नागपूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक वेगळी ठरणार आहे. मागील पाच वर्षात राज्यात वेगळीच राजकीय समीकरणे दिसून आली आहेत. तर, दुसऱ्या बाजूला यंदा जागा वाटपाच्या मुद्यावर बंडखोरीची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने दोन्ही बाजूंसाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे. तर, राज्यात विधानसभा निवडणुकीत हरियाणा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. विदर्भातील 62 जागांसाठी 2 हजारांहून अधिक उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली आहे. ही अर्ज विक्री हरियाणा पॅटर्नचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यंदाच्या निवडणूक निकालानंतर राज्यातील सत्ता स्थापनेत विदर्भाची महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. त्यामुळे अधिकाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट्य दोन्ही आघाडींनी ठेवले आहे.

हरियाणा पॅटर्नची चर्चा का?

हरियाणात भाजपविरोधी जनमत असल्याचे म्हटले जात होते. तरीदेखील भाजपने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. या निवडणुकीत सत्ताविरोधी मतांमध्ये फाटाफूट झाल्याचे दिसून आले. काही जागांवर बंडखोरांनी लक्षणीय मते घेतली. तर, दुसरीकडे लहान घटक पक्ष, अपक्षांनीदेखील काही मते खेचली. त्याच्या परिणामी मतांची टक्केवारी जवळपास भाजप इतकीच असूनही काँग्रेसला विरोधी बाकांवर बसावे लागले.
advertisement
आता हाच पॅटर्न राज्यात सुद्धा लागू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. विदर्भात उमेदवारी अर्ज विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे. विदर्भातील 62 जागांसाठी 2034 अर्ज विक्री करण्यात आली. उमेदवारी अर्जासाठी आणखी पाच दिवस असून जवळपास 10 हजार उमेदवार अर्जांची विक्री केली जाईल असे म्हटले जाते. असे झाल्यास विदर्भात मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची गर्दी दिसून येईल.
advertisement

हरियाणा पॅटर्न महायुतीला तारेल का?

विदर्भात सध्या महायुती विरूद्ध वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत हे दिसून आले. भाजपने दोन प्रमुख पक्षात फूट पाडल्याने, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाल्याने भाजपविरोधात संताप व्यक्त केले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचा झटका बसला होता. पंतप्रधान मोदींचा चेहरा असूनही भाजप-महायुतीला पराभवाचा धक्का बसला होता.
advertisement
हरियाणातही भाजपच्या सरकारविरोधात संताप होता. मात्र, भाजपने आपल्या विरोधी मतांचे अधिकाधिक विभाजन कसे होईल, यासाठी प्रयत्न केले. अधिकाधिक उमेदवार उभे राहतील याची काळजी घेऊन सरकारविरोधी मतांमध्ये फूट पाडली आणि तिसऱ्यांदा सत्तेत आले. अशीच खेळी राज्यातही भाजपकडून खेळली जाईल, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याने हरियाणा पॅटर्नचे संकेत दिसू लागले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections: विदर्भात हरियाणा पॅटर्नचे संकेत! पहिल्याच दिवशी 62 जागांसाठी 2 हजारांहून अधिक अर्ज विक्री, कोणाच्या पथ्यावर?
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement