Maharashtra Elections Manoj Jarange Patil: पंकजाताईंना दाखवलं आस्मान, आता धनुभाऊंची बारी? जरांगे सैनिक बीडचा ताबा घेणार!

Last Updated:

Maharashtra Elections : लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर धनंजय मुंडे यांचे विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra Elections Manoj Jarange Patil: पंकजाताईंना दाखवलं आस्मान, आता धनुभाऊंची बारी? जरांगे सैनिक बीडचा ताबा घेणार!
Maharashtra Elections Manoj Jarange Patil: पंकजाताईंना दाखवलं आस्मान, आता धनुभाऊंची बारी? जरांगे सैनिक बीडचा ताबा घेणार!
अंतरवाली सराटी : महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत जरी असली तरी आता मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. काही ठिकाणी उमेदवार लढणार आहेत, तर काही ठिकाणी उमेदवार पाडण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर धनंजय मुंडे यांचे विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये उपस्थितांशी संवाद साधताना कोणत्या जागा लढवणार आणि कोणत्या जागा पाडणार याची घोषणा केली. जरांगे पाटील यांच्या घोषणेने राज्यातील सत्ता समीकरणावर परिणाम होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासोबत मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाच्या मतांची मोट बांधली आहे.
advertisement

बालेकिल्ल्यात जरांगेंची रणनीती ठरली...

मराठवाडा हा मराठा आरक्षणाचा बालेकिल्ला समजला जातो. मराठवाड्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी रणनीति ठरवली आहे. मनोज जरांगे हे प्रत्येक जिल्ह्यात एक मराठा उमेदवार देणार आहे. तर, इतर ठिकाणी काही उमेदवारांना पाठिंबा देणार असून काही उमेदवारांना पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी बीडमध्ये फक्त केज हा राखीव मतदारसंघ निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. या ठिकाणी भाजपच्या नमिता मुंदडा या विद्यमान आमदार असून त्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. बीडमधील सगळ्याच जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा होती. पण, जरांगे यांनी एकच उमेदवार दिला आहे.
advertisement

धनंजय मुंडेंचे काय?

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपवर असलेल्या नाराजीचा फटका पंकजा मुंडे यांना बसला. पंकजा यांचा या निवडणुकीत पराभव झाला. आता, परळीचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आमदार आहेत. आता, या मतदारसंघात मनोज जरांगे हे धनंजय मुंडे यांना पाडण्यासाठी आव्हान करणार की आणखी कोणाला पाठिंबा देणारे लवकरच स्पष्ट होईल.
advertisement

>> बीडमधील आमदारांची यादी (List Of Beed District MLA)

> गेवराई विधानसभा - लक्ष्मण पवार (भाजप)
> माजलगाव विधानसभा - प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी - अजित पवार)
> बीड विधानसभा - संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - शरद पवार)
> आष्टी विधानसभा - बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी - अजित पवार)
> केज विधानसभा - नमिता मुंदडा (भाजप)
advertisement
> परळी विधानसभा - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Manoj Jarange Patil: पंकजाताईंना दाखवलं आस्मान, आता धनुभाऊंची बारी? जरांगे सैनिक बीडचा ताबा घेणार!
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement