Maharashtra Elections Rahul Gandhi : Special Story राहुल गांधींचा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नवीन डाव, मविआला बुस्टर डोस मिळणार?

Last Updated:

Rahul Gandhi Election Rally Maharashtra : निवडणूक प्रचारासाठी काही मोजकेच दिवस असताना आता काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी नवा डाव टाकला आहे.

(राहुल गांधी)
(राहुल गांधी)
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. निवडणूक प्रचारासाठी काही मोजकेच दिवस असताना आता काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी नवा डाव टाकला आहे. राहुल गांधी हे महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याने काही प्रचाराची दिशा ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या तोफा धडधडत होत्या. तर, काँग्रेसकडू नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि इतर नेत्यांच्या प्रचारसभा सुरू होत्या. आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उतरणार आहेत.

राहुल गांधी यांचा नवा डाव...

राहुल गांधी यांची काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात सभा होणार होती. पण, विमानात बिघाड झाल्याने पुन्हा माघारी जावे लागले होते. त्यानंतर आज नंदुरबार आणि नांदेडमधील जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. त्यापूर्वीच राहुल गांधी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.
advertisement
या व्हिडीओत शेतकरी सोयाबीनचे दर आणि इतर मुद्यांबाबतच्या समस्या राहुल गांधींसमोर मांडत असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी हमीभावानुसार सोयाबीनची खरेदी होत नसल्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. राहुल गांधी यांनी आमचं सरकारच आल्यास 3 लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी कर्ज माफ करणार असल्याचे आश्वासन राहुल यांनी दिले. सोयाबीन योग्य दर कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणार असल्याचे राहुल यांनी सांगितले.
advertisement
advertisement

मिशन विदर्भ यशस्वी होणार?

विदर्भात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. राज्यातील सत्ता समीकरणे विदर्भावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. त्यामुळे आता राहुल यांचा नवा डाव हा राज्यात मविआला बुस्टर डोस ठरेल का, हे निवडणूक निकालात समजेल.

इतर महत्त्वाची बातमी :

advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Rahul Gandhi : Special Story राहुल गांधींचा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नवीन डाव, मविआला बुस्टर डोस मिळणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement