Maharashtra Elections : शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार यादीबाबत मोठी अपडेट, जाहीर झालेले उमेदवार बदलणार!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections Shiv Sena UBT Candidate List: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार यादीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गट आता जाहीर केलेल्या यादीतून काही नावे बदलणार आहे.
उदय जाधव, प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला नाही. काही जागांवरून आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कुरबुरी सुरू आहेत. महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चा सुरू असताना तिन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता, शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार यादीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गट आता जाहीर केलेल्या यादीतून काही बदलणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाने पहिल्या यादीत 65 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीमध्ये आता बदल होणार आहे. त्यामुळे यादीत नावे आलेले उमेदवार गॅसवर आहेत. महाविकास आघाडीमध्ये काही मोजक्या जागांवर तिढा आहे. तिढा असलेल्या जागांवर सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या उमेदवारांवरून एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
महाविकास आघाडीमध्ये यात 65 जागा ज्या शिवसेना ठाकरे गटांनी जाहीर केल्या आहेत. त्यातील मोजक्या तीन ते चार जागांवर काही ठिकाणी काँग्रेसचे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे आग्रही आहेत. त्यामुळे उमेदवारी संदर्भात पुन्हा एकदा पुनर्विचार केला जावा अशी मागणी त्या पक्षाकडून शिवसेना ठाकरे गटाला करण्यात आली आहे.
advertisement
किती उमेदवारांची नावे बदलण्यात येणार?
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या आग्रहानंतर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या यादीतील काही नावे बदलण्याची तयारी दर्शवली होती. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील 65 उमेदवारांपैकी काही मोजकेच 3 ते 4 उमेदवारांच्या नावात बदल होणार असल्याची माहिती आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 25, 2024 3:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार यादीबाबत मोठी अपडेट, जाहीर झालेले उमेदवार बदलणार!









