Maharashtra Elections Shiv Sena Vs Shiv Sena : विधानसभेत ठाकरे-शिंदेंचे शिलेदार एकमेकांना भिडणार!'या' जागांवर दिसणार राजकीय ठस्सन, पाहा यादी...

Last Updated:

Maharashtra Assembly Elections : शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक राज्यातील जवळपास 47 मतदारसंघात दिसणार आहे. लढतीचे खरे चित्र हे 4 नोव्हेबर नंतर दिसून येणार आहे.

ठाकरे-शिंदेंचे शिलेदार एकमेकांना भिडणार!'या' जागांवर दिसणार राजकीय ठस्सन, पाहा यादी...
ठाकरे-शिंदेंचे शिलेदार एकमेकांना भिडणार!'या' जागांवर दिसणार राजकीय ठस्सन, पाहा यादी...
मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली. इतकंच नाही तर शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील गटाकडे गेले. त्यानंतर शिवसेना ठाकरे आणि शिंदे या गटातील राजकीय संघर्ष आणखीच तीव्र झाला. लोकसभेच्या निवडणुकीत याची चुणूक दिसली होती. आता विधानसभा निवडणुकीत या राजकीय संघर्षाला अधिकच धार येणार असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आपल्या पक्षाचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. तर, दुसरीकडे आपलाच पक्ष हा खरी शिवसेना असल्याचे सिद्ध करत उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लावण्यासाठी शिंदे गटाचे शिवसैनिक तयार आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक राज्यातील जवळपास 47 मतदारसंघात दिसणार आहे. लढतीचे खरे चित्र हे 4 नोव्हेबर नंतर दिसून येणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत ही 4 नोव्हेंबर रोजी आहे.
advertisement

>> या मतदारसंघात होणार ठाकरे विरुद्ध शिंदे गटात मुकाबला...

कोपरी-पाचपाखाडी
एकनाथ शिंदे (शिवसेना शिंदे)
केदार दिघे (शिवसेना ठाकरे )
मागाठणे
प्रकाश सुर्वे (शिवसेना शिंदे)
उदेश पाटेकर (शिवसेना ठाकरे )
विक्रोळी
सुवर्णा करंजे (शिवसेना शिंदे)
सुनील राऊत (शिवसेना ठाकरे )
भांडुप पश्चिम
अशोक धर्मराज पाटील (शिवसेना शिंदे)
रमेश कोरगावकर (शिवसेना ठाकरे )
जोगेश्वरी पूर्व
मनिषा वायकर (शिवसेना शिंदे)
advertisement
अनंत (बाळा) नर (शिवसेना ठाकरे )
दिंडोशी
संजय निरुपम (शिवसेना शिंदे)
सुनील प्रभू (शिवसेना ठाकरे )
अंधेरी पूर्व
मूरजी पटेल (शिवसेना शिंदे)
ऋतुजा लटके (शिवसेना ठाकरे )
चेंबूर
तुकाराम काते (शिवसेना शिंदे)
प्रकाश फातर्पेकर (शिवसेना ठाकरे )
कुर्ला
मंगेश कुडाळकर (शिवसेना शिंदे)
प्रविणा मोरजकर (शिवसेना ठाकरे )
माहिम
सदा सरवणकर (शिवसेना शिंदे)
महेश सावंत (शिवसेना ठाकरे )
advertisement
वरळी
मिलिंद देवरा (शिवसेना शिंदे)
आदित्य ठाकरे (शिवसेना ठाकरे )
भायखळा
यामिनी जाधव (शिवसेना शिंदे)
मनोज जामसुतकर (शिवसेना ठाकरे )
पालघर
राजेंद्र गावित (शिवसेना शिंदे)
जयेंद्र दुबळा (शिवसेना ठाकरे )
बोईसर
विलास तरे (शिवसेना शिंदे)
विश्वास वळवी (शिवसेना ठाकरे )
भिवंडी ग्रामीण
शांताराम मोरे (शिवसेना शिंदे)
महादेव घाटळ (शिवसेना ठाकरे )
advertisement
कल्याण पश्चिम
विश्वनाथ भोईर (शिवसेना शिंदे)
सचिन बासरे (शिवसेना ठाकरे )
अंबरनाथ
बालाजी किणीकर (शिवसेना शिंदे)
राजेश वानखेडे (शिवसेना ठाकरे )
कल्याण ग्रामीण
राजेश मोरे (शिवसेना शिंदे)
सुभाष भोईर (शिवसेना ठाकरे )
ओवळा-माजीवडा
प्रताप सरनाईक (शिवसेना शिंदे)
नरेश मणेरा (शिवसेना ठाकरे )
कर्जत
महेंद्र थोरवे (शिवसेना शिंदे)
नितीन सावंत (शिवसेना ठाकरे )
महाड
भरतशेठ गोगावले (शिवसेना शिंदे)
advertisement
स्नेहल जगताप (शिवसेना ठाकरे )
नेवासा
विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना शिंदे)
शंकरराव गडाख (शिवसेना ठाकरे )
कळमनुरी
संतोष बांगर (शिवसेना शिंदे)
संतोष टारफे (शिवसेना ठाकरे )
परभणी
आनंद भरोसे (शिवसेना शिंदे)
राहुल पाटील (शिवसेना ठाकरे )
सिल्लोड
अब्दुल सत्तार (शिवसेना शिंदे)
सुरेश बनकर (शिवसेना ठाकरे )
कन्नड
संजना जाधव (शिवसेना शिंदे)
उदयसिंह राजपूत (शिवसेना ठाकरे )
advertisement
औरंगाबाद पश्चिम
संजय शिरसाट (शिवसेना शिंदे)
राजू शिंदे (शिवसेना ठाकरे )
पैठण
विलास भुमरे (शिवसेना शिंदे)
दत्ता गोर्डे (शिवसेना ठाकरे )
वैजापूर
रमेश बोरनारे (शिवसेना शिंदे)
दिनेश परदेशी (शिवसेना ठाकरे )
चोपडा
चंद्रकांत सोनवणे (शिवसेना शिंदे)
राजू तडवी (शिवसेना ठाकरे )
बुलढाणा
संजय गायकवाड (शिवसेना शिंदे)
जयश्री शेळके (शिवसेना ठाकरे
मेहकर
संंजय रायमुलकर (शिवसेना शिंदे)
सिद्धार्थ खरात (शिवसेना ठाकरे )
बाळापूर
बळीराम शिरसकर (शिवसेना शिंदे)
नितीन देशमुख (शिवसेना ठाकरे )
रामटेक
आशिष जैस्वाल (शिवसेना शिंदे)
विशाल बरबटे (शिवसेना ठाकरे )
नांदगाव
सुहास कांदे (शिवसेना शिंदे)
गणेश धात्रक (शिवसेना ठाकरे )
उस्मानाबाद
अजित पिंगळे (शिवसेना शिंदे)
कैलास पाटील (शिवसेना ठाकरे )
परांडा
तानाजी सावंत (शिवसेना शिंदे)
राहुल ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना ठाकरे )
बार्शी
राजेंद्र राऊत (शिवसेना शिंदे)
दिलीप सोपल (शिवसेना ठाकरे )
सांगोला
शहाजी बापू पाटील (शिवसेना शिंदे)
दीपक आबा साळुंखे (शिवसेना ठाकरे )
पाटण
शंभूराज देसाई (शिवसेना शिंदे)
हर्षद कदम (शिवसेना ठाकरे )
दापोली
योगेश कदम (शिवसेना शिंदे)
संजय कदम (शिवसेना ठाकरे )
गुहागर
राजेश बेंडल (शिवसेना शिंदे)
भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे )
रत्नागिरी
उदय सामंत (शिवसेना शिंदे)
सुरेंद्रनाथ (बाळ) माने (शिवसेना ठाकरे )
राजापूर
किरण सामंत (शिवसेना शिंदे)
राजन साळवी (शिवसेना ठाकरे )
कुडाळ
नीलेश राणे (शिवसेना शिंदे)
वैभव नाईक (शिवसेना ठाकरे )
सावंतवाडी
दीपक केसरकर (शिवसेना शिंदे)
राजन तेली (शिवसेना ठाकरे )
राधानगरी
प्रकाश आबिटकर (शिवसेना शिंदे)
के. पी. पाटील (शिवसेना ठाकरे )
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Shiv Sena Vs Shiv Sena : विधानसभेत ठाकरे-शिंदेंचे शिलेदार एकमेकांना भिडणार!'या' जागांवर दिसणार राजकीय ठस्सन, पाहा यादी...
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement