Maharashtra Elections Shiv Sena : सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच नको ते घडलं, बालेकिल्ल्यातला शिवसैनिक हळहळला...

Last Updated:

Maharashtra Elections Shiv Sena Vs Shiv Sena UBT : याच बदललेल्या राजकारणात आणखी एक गोष्ट घडली आहे. गिरणगावात शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक गोष्ट घडली आहे.

सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच नको ते घडलं, बालेकिल्ल्यातला शिवसैनिक हळहळला...
सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच नको ते घडलं, बालेकिल्ल्यातला शिवसैनिक हळहळला...
मुंबई :  यंदाची विधानसभा निवडणूक चुरशीची ठरणार असल्याची चर्चा आहे. राज्याच्या राजकारणात मागील 5 वर्षात मोठी उलथापालथ झाली आहे. मागील निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीमुळे नवीन समीकरण दिसून आले. तर, दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाले. याच बदललेल्या राजकारणात आणखी एक गोष्ट घडली आहे. गिरणगावात शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक गोष्ट घडली आहे. बालेकिल्ल्यातील शिवडी विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच धनु्ष्य बाणाशिवाय आणि मुख्य म्हणजे शिवसेनेचा उमेदवारच नसणार आहे.
शिवडी मतदारसंघातील लालबाग-परळ हा गिरणगावचा एक भाग समजला जातो. बहुसंख्य मराठी भाषिक, गिरणी कामगारांचा हा परिसर आहे. मराठी सण, उत्सवांची मोठी परंपरा या भागात सुरू आहे. कापड गिरण्या असलेल्या या भागात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. मात्र, 1970 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले. त्यानंतर या परिसरावरून डावे पक्ष कमकुवत झाले आणि कालओघात हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. तेव्हापासून आतापर्यंत या भागात शिवसेनेचा उमेदवार कायम निवडणुकीच्या रिंगणात राहिला आहे.
advertisement
गिरण्या बंद झाल्यानंतर या ठिकाणी मॉल, मोठे निवासी प्रकल्प उभारले गेले. चाळींचा पुनर्विकासही मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर हा भाग संमिश्र वस्तीचा परिसर झाला असला तरी मराठी माणसांचा परिसर म्हणून हा भाग पाहिला जातो. शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवडी, लालबाग-परळ हा परिसर येतो. आता या भागात पहिल्यांदाच निवडणूक धनुष्य बाणाशिवाय होणार आहे.
advertisement

शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय निवडणूक...

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षावरच दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील गटाला दिले. तर, ठाकरे गटाला वेगळा पक्ष आणि निवडणूक चिन्हाची ओळख मिळाली. एका अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही निवडणूक आयोगाच्या दृष्टीने हा खरा पक्ष आहे.
advertisement

ठाकरेंचा उमेदवार पण शिंदेचा नाही...

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या भागात यंदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार अजय चौधरी हे उमेदवार असणार आहेत. तर, त्यांच्यासमोर मनसेचे बाळा नांदगावकर हे उमेदवार आहेत. महायुतीमधील शिवसेना आणि भाजपकडून या मतदारसंघात उमेदवार देण्यात आला नाही. शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा होती. भाजपच्या काही नेत्यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत शिवसेना-भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.
advertisement

मतदारसंघातून धनुष्य-बाण गायब....

शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी हे मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेने उमेदवार न दिल्याने आता शिवडी मतदारसंघातून धनुष्य-बाण गायब झाला आहे.
शिवडी विधानसभा निवडणुकीत मशाल विरुद्ध इंजिन अशी लढत होणार आहे. मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांना महायुती पाठिंबा जाहीर करणार. आता, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचे इंजिन धावेल की ठाकरेंच्या मशाल धगधगती राहणार, हे निवडणूक निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Shiv Sena : सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच नको ते घडलं, बालेकिल्ल्यातला शिवसैनिक हळहळला...
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement