Maharashtra Assembly Session: विधानसभेत राडा! शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक, नाना पटोलेंवर निलंबनाची कारवाई
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Session: काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली.
मुंबई: विधानसभेत आज शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर गेले. त्यावरून आज दिवसभरासाठी नाना पटोले यांच्यावर दिवसभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
विरोधकांनी आज सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबन लोणीकर यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. मोदी त्यांचा बाप होऊ शकतो पण शेतकऱ्यांचा होऊ शकत नाही, पटोले यांनी म्हटले. यावर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना तुमच्याकडून असंसदीय शब्दाची अपेक्षा नसल्याचे म्हटले. त्यानंतर राजदंडाला स्पर्श झाल्यास काय कारवाई होते, याची नाना पटोले यांना कल्पना आहे. त्यामुळे कारवाईस भाग पाडू नका असा इशारा दिला.
advertisement
Nana Patole Vs Rahul Narvekar : सभागृहात राडा, मुख्यमंत्री भडकले, नाना पटोलेंनी नेमकं काय केलं?
सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अध्यक्षांवर धावून जाणे चुकीचे असल्याचे सांगत पटोले यांनी माफी मागण्याची मागणी केली. त्यानंतरही गदारोळ सुरू होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करत असल्याचे जाहीर केले.
advertisement
नाना पटोले यांचे निलंबन जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर निलंबनाच्या कारवाईवर संतप्त झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 01, 2025 12:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Assembly Session: विधानसभेत राडा! शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक, नाना पटोलेंवर निलंबनाची कारवाई