Maharashtra Cabinet: वीज दर सवलतीचा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा, संभाजीनगरसाठी गुडन्यूज, कॅबिनेटचे ४ महत्त्वाचे निर्णय

Last Updated:

Maharashtra Cabinet: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली असून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठक
महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठक
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या वीज दर सवलतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून छत्रपती संभाजीनगरच्या धगधगत्या पाणी प्रश्नावर उतारा म्हणून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी रुपये मंजरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. ऊर्जा विभाग, नगरविकास, मृदा आणि जलसंधारण विभाग आणि महसूल विभाग अशा चार विभागांअंतर्गत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांना दिलासा, उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या १ हजार ७८९ योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ (ऊर्जा विभाग)
advertisement

संभाजीनगरच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी रुपये

नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून २००० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी रुपये, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी २६८ कोटी रुपये, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ११६ कोटी रुपये कर्ज उभारणी करणार (नगरविकास विभाग)
advertisement

लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता

अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी (ता. मुर्तिजापूर) येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता. मुर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार, शेतीला पाणी, शेतकऱ्यांना फायदा (मृद व जलसंधारण विभाग)

शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी

रायगड जिल्ह्यातील मौजे आसुडगाव (ता. पनवेल) येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने (रहिवास क्वार्टर्स) बांधण्यासाठी देण्यास मान्यता (महसूल विभाग)
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet: वीज दर सवलतीचा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा, संभाजीनगरसाठी गुडन्यूज, कॅबिनेटचे ४ महत्त्वाचे निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement