Maharashtra Elections 2024 : महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदे नाही? अमित शहांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Last Updated:

राज्यात निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आल्यास विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पु्न्हा मुख्यमंत्री होतील की नाही, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

Amit Shah Eknath Shinde
Amit Shah Eknath Shinde
प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चा सुरू आहेत. तर, दुसरीकडे निवडणुकीनंतर सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण असणार याबाबत दोन्ही आघाड्यांकडून थेट भाष्य न करता सावध पवित्रा घेतला जात आहे. दरम्यान, राज्यात निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आल्यास विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पु्न्हा मुख्यमंत्री होतील की नाही, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचे वक्तव्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.
जागा वाटपाच्या चर्चे दरम्यान अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केले. आम्ही तुम्हाला मु्ख्यमंत्रीपद दिले. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला, असे वक्तव्य शहा यांनी केले असल्याचे समोर आले. त्यानंतर आता या निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
महायुतीमध्ये भाजप 155 ते 160 जागा लढवणार आहे. तर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना उर्वरित जागा मिळणार आहे. सध्या महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, शिवसेनेतून बंडखोरी केलेले नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. आता, राज्यातील निवडणुका झाल्यानंतर भाजप नमतं घेणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर दावा करणार असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement

अमित शहा नेमकं काय म्हणाले होते?

‘या देशात पीएम, सीएम, प्रांत ही तीनच महत्त्वाची पदं आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. ती कामं पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला,’ असे सूचक विधान अमित शहा यांनी केले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदे नाही? अमित शहांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement