Maharashtra Elections Mahim : CM शिंदेंचा मनसेच्या 'इंजिन'ला ग्रीन सिग्नल, पण सदा सरवणकरांची राज ठाकरेंसमोर 'ही'अट!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Elections 2024: माहिम मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी माघारीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
मुंबई : माहिम मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी माघारीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला थोड्या वेळापूर्वी फोन आला असल्याचे सांगितले. महायुतीचे अधिकाधिक आमदार विजयी व्हावे अशी इच्छा असल्याचे सांगत उमेदवारी माघारीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले.
माहिममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरले आहेत. तर, सदा सरवणकर देखील शिंदे गटाकडून उमेदवार आहेत. शिवसेना ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी सातत्याने भाजपकडून मागणी होत आहे. इतकंच नाहीतर भाजप अमित ठाकरेंचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याशिवाय, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील सरवणकरांनी माघार घ्यावी अशी मागणी केली आहे. त
advertisement
उमेदवारी घेण्यास तयार पण...
सदा सरवणकर यांनी सांगितले की, पत्रकार परिषद घेण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन कॉल आला होता. एकनाथ शिंदे आमचे नेते ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे हीच इच्छा आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा कार्यकर्त्यांसोबत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण उमेदवारी मागे घेण्यास तयार आहोत. पण, आपली एक अट असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आपल्या मनसेचे मुंबईतील सगळेच उमेदवार मागे घ्यावेत, अशी अट सरवणकरांनी घातली आहे.
advertisement
मनसेने मुंबईतही उमेदवार उभे केले आहेत. महायुतीसाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. मनसेच्या उमेदवारांमुळे मतविभागणी होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतील उमेदवार मागे घ्यावे आणि त्यानंतर मी माझी उमेदवारी मागे घेईल, असे आमदार सरवणकरांनी म्हटले.
माहिममध्ये हायव्होल्टेज लढत!
दादर माहिम मतदारसंघात शिवसेना भवन असल्याने येथील विजय पराजयाला वेगळेच महत्व आहे. शिवसेनेवर दावा सांगितल्यानंतर आणि पक्षासह चिन्ह देखील मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना भवन असलेल्या दादर माहिम मतदारसंघात तीन टर्मचे आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. दुसरीकडे दादर माहिम जिंकण्यासाठी विभागप्रमुख महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांनी रिंगणात उतरवले आहे.
advertisement
अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने दादर माहिमची लढत तिरंगी होणार आहे. अमित ठाकरे यांना निवडणूक जड जाऊ नये किंबहुना त्यांना पाठिंबा द्यावा, यासाठी महायुतीतील राज ठाकरे यांचे निकटवर्तीय नेते प्रयत्नशील आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 04, 2024 11:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Mahim : CM शिंदेंचा मनसेच्या 'इंजिन'ला ग्रीन सिग्नल, पण सदा सरवणकरांची राज ठाकरेंसमोर 'ही'अट!









