Maharashtra Elections Baramati : युगेंद्रच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ

Last Updated:

Maharashtra Elections Yugendra Pawar : बारामतीमध्ये सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली आहे. सोमवारी रात्री युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली.

युगेंद्रच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
युगेंद्रच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानसाठी काही तास उरले असताना मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील सर्वात मोठी हायव्होल्टेज लढत असलेल्या बारामती मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. तर, दुसरीकडे बारामतीमध्ये सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली आहे.
सोमवारी रात्री युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली. अजित पवार यांचे बंधू आणि युगेंद्र यांचे वडील श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्सच्या बारामती शोरूम मध्ये रात्री पोलिसांनी मोठं सर्च ॲापरेशन केल. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना या शोरुममध्ये काय सापडलं, नेमकं कोणत्या कारणाने ही शोध मोहीम राबवण्यात आलाी, याची माहिती समोर आली नाही. मात्र, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेतल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. राज्यासह देशाचे लक्ष बारामतीमधील निवडणुकीकडे लागले आहे. शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आपण कुटुंबात एकटे पडलो असल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अजित पवार आणि त्यांचे कुटुंबीय वगळता पवार कुटुंबातील इतर सगळेजण शरद पवारांसोबत असल्याचे चित्र आहे. श्रीनिवास पवार यांनीदेखील अजित पवारांना विरोध दर्शवला होता.
advertisement

युगेंद्र पवार यांनी काय म्हटले...?

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी म्हटले की, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शो रुम ऑफिसमधून फोन आला. त्यावेळी आपल्याकडे पोलिसांचे एक पथक आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मी पोलिसांना सहकार्य करण्याची सूचना तेथील कर्मचाऱ्यांना दिली. आम्ही काहीच चुकीचं करत नव्हतो, त्यामुळे पोलिसांना काहीच सापडलं नाही. शरद पवारांनी संबोधित केलेल्या सांगता सभेला आलेली गर्दी पाहून काहीजण बिथरले असावेत. पण, बारामतीचं राजकारण या पातळीवर आलं असेल तर दुर्देव असल्याचे युगेंद्र पवारांनी सांगितले.
advertisement

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय म्हटले?

बारामती येथील शरयू टोयोटा या शोरूम वर रात्री सर्च ऑपरेशन करण्यात आले या संदर्भात बारामती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी माहिती देताना सांगितले की, यासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी प्राप्त झाल्यानुसार आम्ही या ठिकाणचे सर्च ऑपरेशन केले. या परिसरात कुठल्याही प्रकारची रक्कम मिळून आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Baramati : युगेंद्रच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
Next Article
advertisement
Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या मतमोजणीस सुरुवात,  निकालाचा पहिला कल काय?
राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेची मतमोजणीस सुरू, निकालाचा पहिला क
  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

View All
advertisement