Maharashtra Elections Result 2024 : मतमोजणीला सुरुवात, पहिला कल समोर, महायुती सुस्साट, मविआ पिछाडीवर

Last Updated:

Maharashtra Elections Counting Early Trends : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे कल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे.

Maharashtra Elections Result 2024 : पहिला कल समोर, मविआ की महायुती आघाडीवर?
Maharashtra Elections Result 2024 : पहिला कल समोर, मविआ की महायुती आघाडीवर?
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे कल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. राज्यात पुढील सरकार कुणाचं येणार? याचा फैसला आज होणार आहे. मतदार राजाने आपल्या मताचे दान कोणाला दिलंय हे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघासाठी मतदान 20 नोव्हेंबरला पार पडलं. एकूण 288 मतदारसंघात 4 हजार 140 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं. तर 9 कोटींनी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यात एकूण 1 लाख 427 मतदान केंद्रावर शांतेत मतदान पार पडलं. त्यानंतर आता, राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निकालाची धाकधूक वाढली आहे.
मतमोजणीच्या पहिल्या कलामध्ये पोस्टल मतदानात महायुती आघाडीवर आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर महायुती जागांवर आणि महाविकास आघाडीत चुरस असल्याचे दिसून येत आहे. मतमोजणीस सुरुवात झाली असून प्रत्येक फेरीनिहाय कल बदलणार आहे. त्यामुळे अंतिम चित्र स्पष्ट होण्यास वेळ लागणार आहे.
यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. पहिल्यांदाच विधासभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी यांनी निवडणुका लढवल्या. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक धनुष्यबाण चिन्हाविना लढले आहेत तर शरद पवार घड्याळ्याशिवाय. पक्षापक्षांतली लढाई, नेत्यानेत्यंमधली लढाई, नात्यागोत्यातली लढाई या निवडणुकीत सर्वात चर्चात राहिली. खरी शिवसेना कुणाची, खरी राष्ट्रवादी कुणाची, राज्यात सत्ता कुणाची? याचे उत्तर आज मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Result 2024 : मतमोजणीला सुरुवात, पहिला कल समोर, महायुती सुस्साट, मविआ पिछाडीवर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement