सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, विजय वडेट्टीवारांची टीका
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आम्हाला सरकारवर विश्वास नाही. 31 हजार 600 कोटींची हिशोब आला कुठून, हा आकड्यांचा खेळ असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
मुंबई : मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. सरकारनं जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची गरज होती, असे म्हणत सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारकडे शेतकरी लक्ष देऊन होते या परिस्थितीवर मात करता येईल अशी भावना शेतकऱ्यांची होती. 15 दिवसात 74 शेतकरी आत्महत्या झाल्या. घरदार उद्धवस्त झाले, शेती वाहून गेली आहे. मोठी मदत मिळेल अस शेतकऱ्यांना वाटत होतं. आज घोषित केलेली मदत तोंडाला पाने पुसणारी गेल्या वेळी 3 हेक्टर पर्यंत मदत केली यावेळी 2 हेक्टर मदत करण्यात आली आहे. हे NDRF चे निकष, निकष सोडून मदत मिळेल ही अपेक्षा होती.
advertisement
कर्ज माफीची अपेक्षा होती : विजय वडेट्टीवार
केंद्र सरकारने राज्याला फक्त 10 हजार हेक्टर मदत केली अस म्हणायचं का? फळबाग, भाजी पाला उत्पादक, शेत पीक मोठे नुकसान झाले. पीक विमा नवीन धोरण नुसार अतिवृष्टी निकषांचा समावेश नाही. सरकार बनवाबनवी कशाला करत आहे, त्यांना त्याची मदत मिळणार नाही. शेतकऱ्याला हवालदिल करून आत्महत्येच्या खाईत लोटत आहे. कर्ज माफीची अपेक्षा होती कर्ज माफ न करता पॅकेज घोषित केले, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
advertisement
31 हजार 600 कोटींची हिशोब आला कुठून? विजय वडेट्टीवारांचा सवाल
सरकारच शेतकरी आणि उद्योजकवर वेगळे वेगळे प्रेम करतात. शेत मजूराची स्थिती आणखी वाईट त्यावर कोणी बोलत नाही. हा पॅकेज शेतकऱ्यांना उभं करणारा नाही तर कर्जाच्या खाईत लोटणार आहे. जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी म्हंटल आता त्याला वर्ष झालं आहे. आम्हाला सरकारवर विश्वास नाही. 31 हजार 600 कोटींची हिशोब आला कुठून, हा आकड्यांचा खेळ असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
advertisement
विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्ही जिल्ह्यात जिल्ह्यत जाऊन मोर्चे काढून शेतकऱ्यांसाठी लढणार आहे. सरकारची भूमिका स्पष्ट त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे, पण आज संकटात अडकलेल्या माणसाला मदत करायला हवी
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 4:05 PM IST