Mira Bhaynder News: भटक्या प्राण्यांची होणार भारी सोय, मिरा- भाईंदरमध्ये उभं राहणार अत्याधुनिक रुग्णालय

Last Updated:

Mira Bhaynder In Stray Animals News: माणसांच्या उपचारासाठी क्लिनिक व्हॅन तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल, पण एक अनोखा पुढाकार घेत मिरा- भाईंदर महानगर पालिकेने भटक्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना सुरू केला आहे.

News18
News18
माणसांच्या उपचारासाठी क्लिनिक व्हॅन तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल, पण एक अनोखा पुढाकार घेत मिरा- भाईंदर महानगर पालिकेने (MBMC) भटक्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना सुरू केला आहे. या फिरत्या दवाखान्याद्वारे कुत्रा, मांजर यांसारख्या छोट्या प्राण्यांवर उपचार केले जाणार आहेत. लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांची आणि मांजरीची खूप काळजी घेतात, परंतु रस्त्यावर फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांची आणि मांजरांची फार कमी लोकं काळजी घेतात. लोकांचे त्यांच्याकडे फार क्वचितच लक्ष जाते. त्यामुळेच मिरा- भाईंदर महानगर पालिकेने पाळीव प्राण्यांच्या उपयोगी उपक्रम चालू केला आहे.
अनेक वेळा रस्त्यावरील भटके कुत्रे आणि मांजरी जखमी होतात, त्यामुळे त्यांची तब्येत बिघडते. त्यांच्याकडे फार कमी लोकांचं लक्ष जातं. प्राणी मित्र किंवा काही निवडक लोकंच त्यांच्या अवस्थेकडे लक्ष देतात. अनेकवेळा लोकं इच्छा असूनही मदत करू शकत नाहीत कारण त्यांना त्यांचे मोफत उपचार कुठे असतील हे माहीत नसते. यामुळेच महानगर पालिकेने नवा फिरता दवाखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल मिरा- भाईंदर महानगर पालिकेने तब्बल 20 लाख रुपये खर्चून फिरता दवाखाना उभारला आहे. हा दवाखाना मिरा- भाईंदर महानगर पालिका क्षेत्रात फिरणार आहे. यामुळे नागरिकांचं जखमी अवस्थेत असलेल्या प्राण्यांवर लक्ष जात नाही, त्यांना उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
advertisement
शहरात मोठ्या प्रमाणात भटके प्राणी आढळतात. यामध्ये कुत्रे, मांजरी, गाय, म्हैस यांसारखे प्राणी शिवाय कबुतर आणि कावळे यांसारख्या पक्ष्यांचीही संख्या मोठी आहे. या प्राण्यांवर योग्य उपचार व्हावेत, म्हणून दोन वर्षांपूर्वी महापालिकेने भाईंदर (पश्चिम) येथे पशु रुग्णालय तसेच मिरा रोड येथे दवाखानाही सुरू करण्यात आले. आतापर्यंत हजारो प्राण्यांवर उपचार करून त्यांना जीवनदान देण्यात आले आहे. मात्र अनेक वेळा जखमी प्राण्यांना घेऊन दवाखान्यात पोहोचू शकत नसल्यामुळे त्यांचा जीव जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक सुविधांनी सुसज्ज फिरता दवाखाना उभारण्याचा निर्णय पालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.
advertisement
यापूर्वीही वाहने लहान असल्यामुळे तो उपक्रम मर्यादित राहिला होता. आता सेवेचा विस्तार करण्यासाठी मोठे वाहन खरेदी करण्यात आले आहे. या वाहनांवर सुमारे 20 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. वाहन लवकरच शहरात कार्यरत होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिली आहे. महापालिकेने नव्याने उभारलेल्या या फिरत्या दवाखान्यात भटक्या प्राण्यांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी आवश्यक पशु वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय साहित्य उपलब्ध असणार आहे. हे वाहन शहरातील विविध भागात फिरून जखमी प्राण्यांचा शोध घेऊन तत्काळ उपचार करणार आहे. याशिवाय लसीकरण मोहिमेतही या वाहनाची विशेष भूमिका असणार आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mira Bhaynder News: भटक्या प्राण्यांची होणार भारी सोय, मिरा- भाईंदरमध्ये उभं राहणार अत्याधुनिक रुग्णालय
Next Article
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement