Eknath Shinde : महायुतीमध्ये All Is Not Well, बैठक रद्द करुन शिंदेंनी तातडीनं मुंबई सोडली

Last Updated:

सरकार स्थापनेसंदर्भात आणि मंत्रिमंडळाबाबत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आलीय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात त्यांची मूळ गावी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेलं नाहीय. दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर तिन्ही नेत्यांची महाराष्ट्रात बैठक होणार होती. पण महायुतीची ही बैठक पुढे ढकलण्यात आलीय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात त्यांची मूळ गावी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महायुतीत मुख्यमंत्री आणि मंत्रिपदांवरून चर्चा सुरू आहेत. या चर्चा सुरू असतानाच शिंदे साताऱ्याला त्यांच्या गावी जाणार असल्याने पुन्हा ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडी घडत असताना अशा वेळी एकनाथ शिंदे त्यांच्या गावी जात असल्यानं महायुतीत आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडताना एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकार पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना असल्याचं सांगितलं होतं. यानंतर दिल्लीत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर तिन्ही नेते महाराष्ट्रात परतले. दरम्यान, मुंबईत होणारी महायुतीच बैठक पुढे ढकलण्यात आलीय.
advertisement
विधानसभेच्या निकालाला आठवडा उलटल्यानंतरही अद्याप महायुतीच्या चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरूच आहे. दिल्लीत तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेतली तेव्हाचा फोटो समोर आला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत आहे. एकनाथ शिंदे यांची अमित शहांसोबत जवळपास २० मिनिटे बैठकही झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली. गेल्या अडीच वर्षात कोणतीही मागणी केली नाही पण कालच्या बैठकीत शिंदेंनी आपल्या मागण्या शहांसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : महायुतीमध्ये All Is Not Well, बैठक रद्द करुन शिंदेंनी तातडीनं मुंबई सोडली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement