Reels बनवली तर निलंबन पक्कं! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची आली कडक नियमावली

Last Updated:

सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून, शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना कर्मचाऱ्यांना नियमावली कटाक्षाने पाळावी नक्की लागणार आहे.

News18
News18
मुंबई: झटपट फेमस होण्यासाठी जो नाही तो इंन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिल्सच्या आहारी गेला आहे. तासंतास रिल्स पाहणाऱ्या लोकांचा मोठा समाजाच आता निर्माण झाला आहे. एवढंच नाहीतर खासगी कर्मचारी आणि शासकीय कर्मचारी सुद्धा रिल्सस्टार होण्यासाठी खटाटोप करत असतात. पण  शासकीय यंत्रणेच्या विश्वासार्हतेला गालबोट लागू नये, गोपनीय माहितीचा गैरवापर कधीही होऊ नये आणि कर्मचारी सोशल मीडियावर शिस्तबद्ध पद्धतीने वागतील यासाठी राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून, शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना कर्मचाऱ्यांना नियमावली कटाक्षाने पाळावी नक्की लागणार आहे.
या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांनी फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), इन्स्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप यासारख्या माध्यमांवर व्यक्त होताना किंवा पोस्ट करताना शासनाच्या धोरणांचे उल्लंघन होता कामा नये. गोपनीय माहिती सार्वजनिक करणे, शासनविरोधी खोट्या किंवा अप्रामाणिक माहितीचा प्रचार करणे, तसंच जाती, धर्म, भाषा, प्रांत किंवा सामाजिक गटांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या टिप्पणी अथवा मजकुराचे प्रसारण यावर बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
नवीन नियमावलीत काय?
शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक खात्यावरून शासकीय निर्णयांविषयी टीका किंवा गैरसमज निर्माण करणारे पोस्ट करू नयेत. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी ती शासनाने अधिकृतपणे जाहीर केली आहे का, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. खातरजमा केल्यामुळे एकाकी माहिती ही प्रसारित होणार नाही आणि चुकीचा संदेश देखील जाणार नाही.
काय होणार कारवाई?
या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची प्रक्रिया राबवली जाईल, असा इशारा परिपत्रकात देण्यात आला आहे. यामध्ये सेवा नियमांचे उल्लंघन केल्यास निलंबन, वेतन कपात, पदोन्नती थांबविणे यासारख्या कारवायांचा समावेश असू शकतो.
advertisement
राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे की, शासकीय कर्मचारी हे शासनाचे चेहरा म्हणून जनतेसमोर असतात. त्यांच्या वर्तनाचा आणि वक्तव्यांचा जनमानसावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर जबाबदारीने वागावं, अचूक आणि अधिकृत माहितीच प्रसारित करावी आणि शासनाच्या कार्यपद्धतीप्रती निष्ठा राखावी, असं आवाहन शासनाने केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Reels बनवली तर निलंबन पक्कं! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची आली कडक नियमावली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement