महाराष्ट्र आंतरजिल्हा कबड्डी चॅम्पियनशिपची घोषणा, केव्हापासून होणार सुरूवात?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
महाराष्ट्र आंतरजिल्हा कबड्डी चॅम्पियनशिपचा (MIYC) लवकरच नवा हंगाम सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कोना कोपर्यातील कबड्डीतील गुणी आणि होतकरू खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
महाराष्ट्र आंतरजिल्हा कबड्डी चॅम्पियनशिपचा (MIYC) लवकरच नवा हंगाम सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कोना कोपर्यातील कबड्डीतील गुणी आणि होतकरू खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. कबड्डी हा खेळ फक्त महाराष्ट्रापुरता सीमित राहिलेला नाही. त्याची ख्याती संपूर्ण जगभरामध्ये आहे. विविध वयोगटातल्या पुरूष- महिलांना या खेळाच्या माध्यमातून खेळण्याची संधी दिली जाते.
महाराष्ट्र आंतरजिल्हा कबड्डी चॅम्पियनशिप (MIYC) चा नवा हंगाम डिसेंबर 2025 पासून आणखी जोश, भव्यता आण व्यावसायिकतेसह रंगणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसएशनचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री गजानन कीर्तिकर आणि क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्राच्या कोनाकोपर्यातील कबड्डीतील गुणी आणि होतकरू खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
advertisement
स्पर्धेचे संचालक संग्राम औटी यांनी सांगतले की, यंदाची स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे होणार असून, 12 जिल्ह्यांच्या संघांमध्ये एकूण 72 सामने खेळवले जाणार आहेत. MIYC ही फक्त एक स्पर्धा नसून, महाराष्ट्रामध्ये कबड्डीची पायाभरणी मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण तसेच युवा खेळाडूंना उज्ज्वल
भविष्य देण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 08, 2025 7:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्र आंतरजिल्हा कबड्डी चॅम्पियनशिपची घोषणा, केव्हापासून होणार सुरूवात?