Maharashtra Local Body Elections : मुंबई, ठाणे, पुणे महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर! समोर आली महत्त्वाची अपडेट

Last Updated:

Local Body Elections : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या निवडणुका होणार असल्याचे म्हटले जात होते.

News18
News18
मुंबई: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिल्यानंतर निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या निवडणुका होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता ऑक्टोबरचाही मुहूर्त टळला जाणार असल्याची चिन्हे आहेत. राज्या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता दिवाळीनंतर होणार असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यात सध्या बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट लागू आहे. यामुळे लोकप्रतिनिधींचा सहभाग नसेलली ही यंत्रणा केवळ अधिकारी वर्गाच्या ताब्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात स्पष्ट आदेश देत, 4 महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याआधी चार आठवड्यांत अधिसूचना जाहीर करावी, असे निर्देश दिले होते
मुंबई महानगरपालिका, इतर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत आता दिवाळीनंतर निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झालं असून, त्यासाठीचे शासकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. प्रभाग रचनेच्या कालमर्यादेला वाढ देण्यात आल्याने आता या निवडणुका लांबणीवर गेल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ऑक्टोबर २०२५ पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारने तत्काळ प्रभाग रचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र, नगरविकास विभागाने सोमवारी (२३ जून) या वेळापत्रकात सुधारणा करत, अहवाल सादरीकरणासाठीची मुदत वाढवली असल्याचे आदेश जारी केले आहेत. प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्याचे प्रारुप जाहीर करणे, त्यावरील हरकती, आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया होईल. त्यानंतर या हरकती, सूचनांवर सुनावणी पार पडणार आहे. त्यानंतरच प्रभाग रचनेच्या अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
advertisement

नवीन सुधारित वेळापत्रक काय?

मुंबई महानगरपालिका: प्रभाग रचना अहवाल सादरीकरणाची अंतिम मुदत 6 ऑक्टोबर 2025
ड वर्गातील महापालिका (म्हणजे लहान व मध्यम आकाराच्या महापालिका): 13 ऑक्टोबर 2025
नगर परिषद व नगरपंचायती: 30 सप्टेंबर 2025
संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना, मुंबई महापालिका आयुक्तांना तसेच नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना हे अहवाल वेळेत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Local Body Elections : मुंबई, ठाणे, पुणे महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर! समोर आली महत्त्वाची अपडेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement