विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम, विरोधकांचा आक्रमक पवित्रा; पहिल्या दिवशी काय घडलं?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.संख्याबळाचा हा दावा विरोधकांनी फेटाळलाय.
नागपूर : विरोधी पक्षनेतेपदाविनाच राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. विरोधी पक्षनेतेपद न देऊन सत्तााधारी संविधानाचा अपमान करत असल्याची टीका भास्कर जाधवांसह विरोधकांनी केली आहे.सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावतानाच भास्कर जाधवांऐवजी ठाकरेंच्या पक्षाकडून या पदासाठी वेगळेच नाव पुढे केल्याचा दावा करत विरोधकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय
अधिवेशनावर अधिवेशनं जाताहेत पण राज्याला विरोधीपक्ष नेता काही मिळत नाहीय. विरोधक विरोधीपक्ष नेतेपद मागताहेत तर सत्ताधारी आमदारांच्या संख्याबळाकडे बोट दाखवताहेत. त्यामुळे विरोधीपक्ष नेतेपदाचं भिजत घोंगडं कायम आहे. अशातच सत्ताधाऱ्यांनी एक वेगळाच दावा करत विरोधकांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय..
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय न झाल्यानं
advertisement
हे अधिवेशन विरोधी पक्षनेतेविनाच होत आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठीचं संख्याबळ नाही. त्यामुळं विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.संख्याबळाचा हा दावा विरोधकांनी फेटाळलाय.
मागील अधिवेशनात भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआकडून देण्यात आलं.. मात्र त्यावर अद्यापही निर्णय न झाल्यानं विरोधकांनी सरकारवर टीकेची तोफ डागलीय..सत्ताधारी संविधानाचा अनादर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर सत्ताधाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावत विधानसभा अध्यक्षांचा याबाबत अंतिम निर्णय असं असं अधोरेखित केलंय.
advertisement
एकीकडे भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत असतानाच ठाकरेंच्या पक्षाकडून आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे करण्यात आल्याचा दावा सत्ताधारी गोटातून केला जातोय.ठाकरेंच्या पक्षानं हा दावा फेटाळून लावत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
ठाकरेंच्या पक्षांमध्ये भांडण लावण्याचा हा प्रकार असल्याचा दावाही करण्यात आलाय.
विरोधी पक्षनेतेपदावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट झाली. अधिवेशनासाठी आलेले नेते एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते. त्यावेळी ही भेट झाल्याची माहिती आहे. विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय हा विधानसभा अध्यक्षाचा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत महाविकास आघाडीचे नेते विधानसभा अध्यक्षांची मंगळवारी भेट घेणार आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 10:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम, विरोधकांचा आक्रमक पवित्रा; पहिल्या दिवशी काय घडलं?


