आजचं हवामान: पुढचे 48 तास महत्त्वाचे, गुजरातकडून येतंय वादळ, महाराष्ट्रावरही होणार परिणाम, 15 जिल्ह्यांसाठी अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबईसह महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भ व मराठवाड्यात यलो अलर्ट, उमाशंकर दास यांच्या माहितीनुसार 2-7 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस आणि ऑक्टोबर हिटचा इशारा.
मुंबई: कोकणात पावसाने कधी नव्हे ते उसंत घेतली आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून रिमझिम पाऊस अधून मधून हजेरी लावत आहे. दिवसा कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी पाऊस यामुळे विचित्र वातावरण तयार झालं आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मिश्र वातावरणामुळे दमट हवामान होत असून उकाडा वाढला आहे. पाऊस पडत असून देखील हवेत गारवा नाही त्यामुळे लोक हैराण झाली आहेत.
मान्सून गेला पावसाचं कारण काय?
गुजरात आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या बाजूने कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचं पुढच्या 24 तासात वादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या दिशेनं ते पुढच्या 48 तासात धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 ते 7 ऑक्टोबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रातही पाऊस येण्याची शक्यता आहे. मान्सूनचा शेवटचा पाऊस हा 30 सप्टेंबर रोजी झाला असं हवामान विभागाने माहिती दिली होती. आता जो पडणार आहे तो कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अवकाळी पाऊस असेल.
advertisement
विदर्भ-मराठवाड्यात अलर्ट
विदर्भातील सर्व तर मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पाहुयात दसऱ्याच्या दिवशी राज्यात हवामान कसं असेल.मराठवाड्यात चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट असून उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस पाऊस सक्रिय राहणार आहे.
advertisement
कधीपर्यंत राहणार पाऊस?
हवामान विभागाने तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्याला याचा फटका बसणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्या 2-3-4 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 3 सप्टेंबर रोजी कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. 40 किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 4 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस राहील. 5 ऑक्टोबर रोजी विदर्भात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. 6 आणि 7 ऑक्टोबरपासून हळूहळू पावसाचा जोर कमी होईल. हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
advertisement
ऑक्टोबर हिटवर मोठी अपडेट
दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबर महिन्यात रात्री उष्णता वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर हिटचा फटका बसू शकतो. ऑक्टोबर हिट वाढणार असून रात्रीच्या वेळी जास्त घामाच्या धारा लागणार आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण होऊ शकतो. ऑक्टोबर हिट हैराण करण्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबर रोजी मान्सूनची एक्झिट झाली आहे. आता अवकाळी पाऊस राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 7:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: पुढचे 48 तास महत्त्वाचे, गुजरातकडून येतंय वादळ, महाराष्ट्रावरही होणार परिणाम, 15 जिल्ह्यांसाठी अलर्ट