'खेले मसाने में होली…' चा सूर हरपला, ऐन दसऱ्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक छिन्नुलाल मिश्रा यांचं निधन
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं गुरुवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी वाराणसी येथे निधन झालं आहे.
प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं गुरुवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी मिर्झापूर येथे निधन झालं आहे. ते मागील काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर बनारस हिंदू विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचार सुरू होते. अलीकडेच २७ सप्टेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. पण गुरुवारी पहाटे त्यांच्या मुलीच्या घरी मिर्जापूरमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. पंडित छन्नूलाल मिश्रा यांनी शास्त्रीय गायनाच्या 'ख्याल' आणि 'पूर्व ठुमरी' शैलींना नवीन उंचीवर नेले होते.
छन्नूलाल मिश्रा कोण होते?
पंडित छन्नूलाल मिश्रा यांचा जन्म ३ ऑगस्ट १९३६ रोजी उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील हरिहरपूर येथे झाला. त्यांनी त्यांचे वडील बद्री प्रसाद मिश्रा यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगिताचे प्राथमिक धडे घेतले. नंतर, त्यांनी किराना घराण्याचे उस्ताद अब्दुल गनी खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं सखोल प्रशिक्षण घेतले. ते प्रसिद्ध तबला वादक पंडित अनोखेलाल मिश्रा यांचे जावई देखील होते. काशीच्या मातीत रुजलेले पंडित छन्नूलाल यांनी त्यांच्या खोल, भावपूर्ण आणि अद्वितीय आवाजाने 'ठुमरी आणि पूर्वा' गायन शैलींना अमर केले.
advertisement
२०२० मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानीत
आपल्या सांगीतिक प्रवासात त्यांनी अनेक टप्पे गाठले आहेत. पंडित छन्नूलाल मिश्रा यांना 2010 मध्ये पद्मभूषण आणि 2020 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी सूर सिंगर संसद, मुंबई कडून शिरोमणी पुरस्कार जिंकला आणि उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार, बिहार संगीत शिरोमणी अकादमी पुरस्कार आणि नौशाद पुरस्कार यासारख्या सन्मानांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना भारत सरकारने संगीत नाटक अकादमी फेलोशिप दिली होती. पंडित छन्नूलाल मिश्रा यांनी 2011 मध्ये प्रकाश झा यांच्या "आरक्षण" चित्रपटात "सांस अलबेली" आणि "कौन सी दोर" सारखी गाणी गायली.
advertisement
कोरोनामध्ये पत्नीसह मुलीचं निधन
तुलसीदासांचे रामायण, कबीरांची भजन, छैत, कजरी आणि ठुमरी यांसारख्या रागांची त्यांची रेकॉर्डिंग आजही श्रोत्यांना मोहित करते. पंडित छन्नूलाल यांना कोविड-19 महामारी दरम्यान वैयक्तिक दुःखाचा सामना करावा लागला. 2021 मध्ये त्यांची पत्नी मनोरमा मिश्रा आणि मुलगी संगीता मिश्रा यांचे COVID-19 मुळे निधन झाले. विशेष म्हणजे 2014 मध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे प्रस्तावक देखील बनले होते.
advertisement
'खेले मसाने में होली…'
पंडित छन्नूलाल मिश्रा यांनी त्यांच्या शास्त्रीय संगीताने लोकांच्या मनात स्थान मिळवलं आहेच. पण त्यांचे "'खेले मसाने में होली…' हे गाणे आजही सर्वांच्या ओठांवर आहे. शास्त्रीय संगिताचा सूर अखेर हरपला आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशीच त्यांचं निधन झाल्याने हळबळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Mirzapur,Uttar Pradesh
First Published :
October 02, 2025 7:09 AM IST
मराठी बातम्या/देश/
'खेले मसाने में होली…' चा सूर हरपला, ऐन दसऱ्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक छिन्नुलाल मिश्रा यांचं निधन