संदीप क्षीरसागर अधिकाऱ्यांना ब्लँकमेल करून टक्केवारी मागतात, योगेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप

Last Updated:

बीड विधानसभा मतदार संघात दोन बंधुंमध्ये लढत होणार आहे. कारण शरद पवारांनी संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांचे विरूद्ध महायुतीचे उमेदवार योगश क्षीरसागर मैदानात आहेत.

बीड विधानसभा मतदार संघात दोन बंधुंमध्ये लढत होणार आहे
बीड विधानसभा मतदार संघात दोन बंधुंमध्ये लढत होणार आहे
 सुरेश जाधव, बीड :  बीड विधानसभा मतदार संघात दोन बंधुंमध्ये लढत होणार आहे. कारण शरद पवारांनी संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांचे विरूद्ध महायुतीचे उमेदवार योगश क्षीरसागर मैदानात आहेत.अशात बीडमध्ये क्षीरसागर बंधुंमध्ये चांगलीच जुंपली आहे. संदीप क्षीरसागर प्रत्येक अधिकाऱ्याकडून ब्लॅकमेल करून टक्केवारी मागत होते, असा गंभीर आरोप योगेश क्षीरसागर यांचा केला आहे.या आरोपांवर आता संदीप क्षीरसागर काय उत्तर देतात,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीचे उमेदवार योगेस क्षीरसागर यांनी गावभेटी सूरू केल्या आहेत. या गावभेटीदरम्यान न्यूज 18 लोकमतशी बोलताना योगेश क्षीरसांगर यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. विद्यमान आमदार प्रत्येक अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करुन दर महिन्याला टक्केवारी मागत होता. तसेच नाही दिले तर हे LAQ करण्याची धमकी द्यायचां असा गंभीर आरोप महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांनी बंधू आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर केला आहे.
advertisement
योगेस क्षीरसागर पुढे म्हणाले की, पवार साहेबांच्या विनवण्या करून विद्यमान आमदारांनी उमेदवारी मिळवली.मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये काय काम केलं याचे उत्तर पवार साहेबाला द्यावं लागेल.त्यामुळे हे निष्क्रिय आमदार आहेत, अशी बोचरी टीका देखील संदीप क्षीरसारग यांच्यावर केली. तसेच बीड मतदारसंघात मागील पाच वर्षात विकासकामे झालेली नाहीत. हा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी जनतेला दिली.
advertisement
दरम्यान योगेश क्षीरसागरांच्या या आरोपानंर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.तसेच या आरोपांवर आता संदीप क्षीरसागर काय उत्तर देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संदीप क्षीरसागर अधिकाऱ्यांना ब्लँकमेल करून टक्केवारी मागतात, योगेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
Next Article
advertisement
Eknath Shinde Shiv Sena:  महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय सांगतात
महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय
  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

View All
advertisement