Maharashtra Elections : सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, शिवसेना-राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांची यादी समोर!

Last Updated:

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. 230 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. या विजयानंतर महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, शिवसेना-राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांची यादी समोर!
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, शिवसेना-राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांची यादी समोर!
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. 230 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. यात भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. या विजयानंतर महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रिपदाबाबत नवी दिल्लीतून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 मंत्री शपथ घेणार आहेत. या नावांवरही शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातून आलेल्या 5 नावांवर दिल्लीमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
शिवसेनेचे हे आमदार शपथ घेणार!
एकनाथ शिंदे
उदय सामंत
तानाजी सावंत
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
राष्ट्रवादीचे हे आमदार शपथ घेणार!
अजित पवार
आदिती तटकरे
अनिल पाटील
धनंजय मुंडे
दिलीप वळसे पाटील
दरम्यान या नावांवर महायुतीचे प्रमुख तीनही नेते बसून यावर चर्चा करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
मंत्री वाटपाचा फॉर्म्युला काय?
महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असणार याबाबतही चर्चा सुरू आहे. 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे सध्या 132 आमदार आहेत, त्यामुळे या फॉर्म्युलानुसार भाजपच्या वाट्याला 22-24 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेच्या 57 जागा असल्यामुळे त्यांना 10-12 मंत्रिपदं तसंच राष्ट्रवादीच्या 41 जागा आल्याने त्यांना 8-10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
मुख्यमंत्री कोण?
दुसरीकडे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. तीनही पक्षांच प्रमुख नेते बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असं महायुतीमधले तीनही पक्ष सांगत आहेत. पण भाजप नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा तर शिवसेना नेत्यांकडून एकनाथ शिंदेंच्या नावाचा आग्रह केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, शिवसेना-राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांची यादी समोर!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement