Malegaon Karkhana Election: माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजितदादांचा विजय. 'ब' गटातलं मताधिक्य किती?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Malegaon Karkhana Election : अनेक राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील मतमोजणी आज सुरू झाली आहे. पहिल्याच फेरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दणदणीत विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
बारामती: बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची दिशा देणाऱ्या आणि अनेक राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील मतमोजणी आज सुरू झाली आहे. पहिल्याच फेरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दणदणीत विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
'ब वर्ग' गटातून झालेल्या मतमोजणीत अजित पवार यांनी तब्बल 91 मतं मिळवत निर्णायक आघाडी घेतली. या गटात एकूण 102 मतांपैकी 101 मतं वैध ठरली आहेत. त्यापैकी 91 मतं अजित पवारांच्या बाजूने पडली. या गटात सहकारी संस्था मतदान करत असतात.
या निवडणुकीत एकूण 19 हजारांहून अधिक मतदार असून, 88.48 टक्के मतदान झालं आहे. कारखान्याच्या संचालक मंडळासाठी 90 उमेदवार रिंगणात असून, मतदार आज एकूण 21 संचालकांची निवड करणार आहेत.
advertisement
निवडणुकीत चुरस...
माळेगाव कारखान्याच्या सत्तेसाठी चार पॅनेल्समध्ये जोरदार चुरस असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळ ठोकून या निवडणुकीत प्रचार केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचं नेतृत्व असलेले बळीराजा बचाव पॅनेल, शरद पवारांचे माजी सहकारी चंद्रराव तावरे यांचं नेतृत्वातील सहकार बचाव पॅनेल यांच्यात चुरस असणार आहे.
advertisement
तावरे यांनी याआधी साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवलं आहे. तावरे हे भाजपचे स्थानिक नेते आहेत. तर, दुसरीकडे अजित पवार यांनी आपल्या पॅनेलची सत्ता आल्यास आपणच अध्यक्षपदी असणार असल्याचे जाहीर केले. त्याशिवाय, त्यांनी विविध आश्वासने दिली.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
June 24, 2025 10:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Malegaon Karkhana Election: माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजितदादांचा विजय. 'ब' गटातलं मताधिक्य किती?